💥महिलांनी येथील वडाच्या झाडाची विधीवत पुजा करुन वटपौर्णिमा सण साजरा केला💥
✍️लक्ष्मीकांत जवळेकर(स्वामी)
पुर्णा (दि.२४ जुन २०२१) - तालुक्यातील ताडकळस येथील महिलांनी कोरोनाच्या प्रादुर्भावा नंतरचा पहिला वटपौर्णिमा हा सण कोरोनाचा प्रादुर्भाव सध्यास्थितीला अतिशय कमी प्रमाणात असल्याने उत्साहाने साजरा केला असुन यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रभावती आंबोरे ,माजी ग्रा.पं.सदस्या साै.मजलसा आंबोरे यांच्यासह आदी महिलांनी येथील वडाच्या झाडाची विधीवत पुजा करुन वटपौर्णिमा सण साजरा केला.
त्याचबरोबर दि. २४ जुन रोजी वडाच्या झाडाची रोपे लावून त्यांची जाेपासना करुन झाड जगउन माेठे झाल्यावर त्यांची पुज्या करुन आधुनिक पद्धतीने सण साजरा केला एकीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्यामुळे पर्यावरणाची हानी होत असतांना या महिलांनी राबविलेला हा उपक्रम अभिनंदनीय व उल्लेखनीय आहे या उपक्रमाच्या यशासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रभावती आंबोरे, साै.मजलसा आंबोरे सह आदी महिलांनी वडाचे वृक्ष जगवन्यासाठी विषेश परीश्रम घेतले यावेळी साै.सरस्वती आंबाेरे, साै.सुनिता आंबाेरे ,साै.वर्षा आंबाेरे, साै.मंगल आंबाेरे, साै.नंदा आंबाेरे, साै. अनिता आंबाेरे, साै. गीतांजली कानडे, साै.सविता जाेशी आदी महीला उपस्थित होत्या .
0 टिप्पण्या