💥जिल्ह्यात आज गुरूवारी २ कोरोनाबाधीत रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू💥
परभणी (दि.१७ जुन २०२१) - परभणी जिल्हात आज गुरूवार दि.१७ जुन २०२१ रोजी केवळ २८ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आज गुरूवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान २ कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज गुरूवार दि.१७ जुन २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेऊन पुर्णपणे बरे झालेल्या १२८ रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने सुट्टी दिली असून जिल्ह्यात आजपर्यंत ५०५३२ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून यशस्वी उपचारा नंतर आजपर्यंत ४८८२३ कोरोनाबाधीत कोरोनामुक्त झाले आहेत तर जिल्ह्यात आजपर्यंत १२६९ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने एका प्रेसनोट द्वारे कळवले आहे...
0 टिप्पण्या