💥शिवसेनेच्या १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल💥
अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाने रद्द केले. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार आनंदराव अडसुळ शहरात दाखल झाल्यांवर कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात जल्लोष केला. यावेळी संचारबंदीचे उल्लंघन करणे शिवसेनिकांना चांगलेच महागात पडले असून सुमारे १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
नवनीत राणा यांचे मुंबई उच्च न्यायालयानं जात प्रमाणपत्र रद्द करून त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.अमरावी लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्या याचिकेवर हा निर्णय न्यायालयाने दिला. याच पार्श्वभुमीवर आनंदराव अडसुळ यांच्या स्वागताचा राजकमल चौकात कार्यक्रम घेतल्याने या प्रकरणात अडसूळ यांच्यासह १०० पेक्षा अधिक शिवसैनिकांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी ११ जूनला गुन्हे दाखल केले. संचारबंदी उल्लंघनासह १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खराटे यांच्या नेत्तृत्वात राजकमल चौकातील सीताराम बाबा मार्केटसमोरील ओट्यावर शिवसैनिकांकडून या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, कोरोना काळात ही बाब संचारबंदी उल्लंघनाची ठरली आहे. त्यामुळे पोलिसांनी अडसूळ यांच्यासह सुनिल खराटे, शाम देशमुख, प्रविण हरमकर यांच्यासह १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आनंदराव अडसुळ यांचा पराभव करून नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, अनंदराव अडसुळ यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला रिट याचिकेद्वारे आव्हान दिले होते. नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मोची असल्याचे दाखलवून मुंबई उपनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अनूसूचित जातीचा दाखला मिळवला होता. मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता समितीने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रमाणपत्र वैध ठरवले असा आरोप अडसूळ यांनी केला होता. खंडपीठाने अंतिम सुनावणी अंती ९ एप्रिल २०२१ रोजी निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी सुनावनी झाल्यानंतर न्यायमूर्ती आर.डी. धनुका आणि न्यायमुर्ती व्हि जी बिश्त यांच्या खंडपीठानं अडसूळ यांची याचिका मान्य केली आणि समितीचा ३ नोव्हेंबर २०१७ रोजीचा निर्णय रद्दबातल केला. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग आला आहे....
0 टिप्पण्या