💥पोलिस दलातील कर्मचारी नितीन लक्ष्मीकांत डहाळे व सराफ व्यवसायीक सचिन डहाळे यांचे ते वडील होते💥
पुर्णा (दि.०४ जुन २०२१) -येथील प्रतिष्ठित सराफ व्यवसायीक लक्ष्मीकांत गंगाधरराव डहाळे यांचे आज शुक्रवार दि.०४ जुन २०२१ रोजी मद्यरात्रीच्या सुमारास हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
सराफा बाजार परिसरातील अत्यंत प्रेमळ स्वभावाचे मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पश्चात पत्नी तिन मुल एक मुलगी नातवंड असा मोठा परिवार असून पोलिस दलातील कर्मचारी नितीन लक्ष्मीकांत डहाळे व सराफ व्यवसायीक सचिन डहाळे यांचे ते वडील होते.
त्यांचा अंतविधी आज शुक्रवार दि.०४ जुन रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास पुर्णा नदी काठावरील हिंदु स्मशानभुमी येथे करण्यात येणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
0 टिप्पण्या