💥पदोन्नतीतील आरक्षणाबाबत 21 जूननंतर भुमिका स्पष्ट करणार : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
परभणी (दि.१२ जुन २०२१) :- मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत २१ जून २०२१ पर्यंत या याचिकांवर निर्णय अपेक्षित आहे, त्यामुळे याबाबत २१ जून २०२१ नंतरच आपण निणार्यक भुमिका स्पष्ट करू अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी परभणीत दिली .
वसमत रस्त्यावरील सावली या शासकीय विश्रामगृहावर ऊर्जामंत्री राऊत यांनी शनिवारी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतेवेळी मराठवाड्यातील मागासवर्गीयांची एक मुठ बांधण्याकरिता आपण दौरा करत आहोत अशी माहिती दिली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या अक्षम्य चुकांमुळे मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप केला .या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, तसेच सर्वोच्च न्यायालयात सुद्धा पुर्णयाचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर २१ जून पर्यत निर्णय अपेक्षित आहे.त्यामुळेच या लढाई बाबत २१ जून नंतरच निर्णय घेतला जाईल असे ऊर्जामंत्री राऊत यांनी नमूद केले. मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत काँग्रेससह सरकार गंभीर आहे. या प्रश्नावरच निर्णय असा लढा उभारला जाईल असेही ते म्हणाले .
यावेळी महापौर सौ.अनिता सोनकांबळे ,रवींद्र सोनकांबळे उपमहापौर भगवानराव वाघमारे, महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार ,बाळासाहेब देशमुख, सिद्धार्थ हत्तींबिरे ,सचिन देशमुख मिलिंद सावंत ,पवन आडळकर बाळासाहेब फुलारी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..,.
0 टिप्पण्या