💥येथील प्रगतिशील शेतकरी अमृतराव कदम यांचे ते वडील होत💥
परभणी (दि.१६ जुन २०२१) - तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भुजंगराव कदम यांचे आज बुधवारी दि.१६ जुन २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,दोन मुली जावई व नातू असा परिवार आहे.
पूर्णा तालुक्यातील राजकीय,सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात भुजंगराव कदम हे कार्यरत होते. विशेषतः विविध संघटना,संस्था यांच्याशी ते संलग्न होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून कदम यांनी अनेक वर्ष काम केले.रेल्वे संघर्ष समितीचे ते तब्बल २० वर्षे अध्यक्ष होते.या माध्यमातून त्यांनी रेल्वे विषयक अनेक प्रश्न सोडवले होते. पूर्णा सहकारी साखर कारखाना व महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ याचे ते संचालक म्हणून कार्यरत होते.पूर्णा येथील गुरूबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक संचालक,सचिव म्हणूनही होते पुर्णा विद्या प्रसारिणी सभेचे ते संचालक होते.शांत,संयमी,दमदार ,धार्मिक असं व्यक्तीमत्व म्हणूण ते सुपरिचित होते.
येथील प्रगतिशील शेतकरी अमृतराव कदम यांचे ते वडील होत.दरम्यान त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी पूर्णा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत...
0 टिप्पण्या