💥नवनियुक्त जिल्हा प़सिध्दी प्रमुखांची एक महत्वाची बैठक सोमवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी 4 वाजता होणार💥
मुंबई : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या नवनियुक्त जिल्हा प़सिध्दी प्रमुखांची एक महत्वाची बैठक सोमवार दिनांक 28 जून रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे.. झूम अँपवरून ही बैठक होईल आणि त्याची लिंक सर्वांना पाठविण्यात येईल.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे उपक़म तसेच कार्यक्रमांना व्यापक प़सिध्दी मिळावी आणि परिषदेने उभी केलेली पत्रकारांच्या हक्काची चळवळ अधिक मजबूत व्हावी यासाठी परिषदेने सर्व जिल्ह्यात प़सिध्दी प्रमुखांच्या रूपानं व्यापक जाळ उभं केलं आहे.. अशा प़कारची रचना असणारी मराठी पत्रकार परिषद ही देशातील पहिली आणि एकमेव पत्रकार संघटना आहे.. प़सिध्दी प़मुखांचे वर्णन एस.एम.देशमुख यांनी परिषदेचे कान आणि डोळे असं केल्याने परिषदेच्या दृष्टीने नव्या व्यवस्थेला किती महत्व आहे ते अधोरेखित होते..
परवाच्या बैठकीत जिल्हा प़सिध्दी प्रमुखांना त्यांच्या कामाचं स्वरूप एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक विषद करणार असल्याने सर्व प़सिध्दी प्रमुखांनी बैठकीस उपस्थित राहवं असं आवाहन कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी आणि राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी केलं आहे..
(प़त्येकाने गुगल प्ले स्टोअर वरून झूम अॅप डाउनलोड करून ध्यावे.. त्यानंतर आलेल्या लिंकवर क्लीक केल्यास आपण ऑनलाईन येऊ शकाल)
0 टिप्पण्या