💥कोणी काहीही बोलतं. कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते भिडल्यानंतर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अयोध्येतील जमीन गैरव्यवहाराच्या आरोपावरुन शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरुन भाजपाने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं असता दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यानंतर भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ही सर्टिफाईड गुंडा पार्टी आहे अशा शब्दांत उत्तर दिलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
💥“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं..!
“कोणी काहीही बोलतं. कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं, कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम करणं, सर्व सहकाऱ्यांना सोबत घेणं प्रत्येकाची जबाबदारी असून काम मुख्यमंत्री त्यापद्धतीने काम करत आहेत”, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
0 टिप्पण्या