💥माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री पावसे यांनी त्यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरवले💥
पूर्णा ; येथील रमेश नाथराव चव्हाण यांचे शालेय शिक्षण विद्या प्रसारिणी सभेची प्राथमिक व माध्यमिक शाळा,पूर्णा येथे झाले असून ते मागील सोळा वर्षापासून गणित विषयाचे अध्यापनाचे कार्य करत आहेत.त्यांनी शेकडो विद्यार्थी घडविले असून त्यांचे अनेक विद्यार्थी अधिकारी पदावर पोहोचले आहेत. त्यांनी आज पर्यंत M.Sc., B.Ed., M.Phil., M.Ed., DSM, SET या पदव्या मिळविल्या आहेत. त्यांची सन 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) , पुणे येथे विशेषाधिकारी (शास्त्र ) या पदावर निवड झाली होती. सन 2018 मध्ये आयआयटी मुंबई तर्फे QIME ( Quality Improvement in Maths Education ) प्रोजेक्टसाठी हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमधून निवड झालेले ते एकमेव माध्यमिक शिक्षक आहेत. सन 2019 मध्ये ते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा एक शोध निबंध जर्नल ऑफ इंडियन केमिकल सोसायटी , कलकत्ता यात प्रदर्शित झालेला आहे. ते सध्या जिल्हा परिषद प्रशाला , जवळा बाजार येथे माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या अध्यापनातील उल्लेखनीय कार्यासाठी हिंगोली जिल्हा परिषद तर्फे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राधाबिनोद शर्मा , जिल्हा परिषद अध्यक्ष तथा शिक्षण सभापती मा.श्री गणाजी बेले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री मनीषभाऊ आखरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री संदीप कुमार सोनटक्के, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री पावसे साहेब यांनी त्यांना *जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार* प्रदान करून गौरविण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे....
0 टिप्पण्या