💥हिंगोलीचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून डॉ.भायेकर यांची निवड💥
परभणी : येथील प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अधिकारी म्हणून मागील सहा वर्षापासून जवाबदारी सांभाळलेले आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायकर यांना पदोन्नती मिळाली असून त्यांची हिंगोली येथे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांना मिळालेल्या पदोन्नती बद्दल पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आज शुक्रवार दि.०२ जुलै २०२१ सकाळी १०-०० वाजता डॉ सचिन भायकर यांचे शाल व श्रीफळ देऊन पत्रकार विनायक यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप राजभोज आरोग्यसेविका मिनाताई रामसेना अंकुश कटारे ,विठ्ठल बारशे ,विनायक काळे, दिगांबर होळपादे आदी मान्यवर उपस्थित होते.....
0 टिप्पण्या