💥अन्यथा बँक समोर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आंदोलन करणार💥
परभणी ; राज्यातील सर्व बँकांना 1 मे ते 1 जून या कालावधीत संपूर्ण शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासंदर्भात शासनाचे निर्देश असताना प्रशासनाचे ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी आजही 90-95 % शेतकरी पीक कर्ज पासून वंचित आहेत. शेतकरी पावसामुळे बि-बीयाने खते खरेदी करण्यासाठी खाजगी सावकाराच्या दारात जाऊन बसण्याची वेळ परभणी जिल्हाप्रशासन व बँक अधिकारी यांनी शेतकऱ्यांनवर आणली आहेत हे तात्काळ थाबवा व प्रशासन व बँक मॅनेजर यांनी संपूर्ण जिल्हातील शेतकऱ्यांचे नियोजन करून तात्काळ शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज वाटप व जुन्या कर्जाचे पुनर्गठन करून संपुर्ण शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात यावे या मागणीसाठीराष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी वतीने मा *.खा.डाँ फौजिया खाँन मँडम, मा.आ.बाबाजाणी दुर्राणी,मा राजेश दादा विटेकर,मा.आ.विजयराव भांबळे,मा.खा.सुरेशराव जाधव,मा.आ.सिताराम मामा घनदाट,मा.रितेश भैय्या काळे,यांच्या मार्गदर्शनाखाली* जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले या वेळी शेतकऱ्यांना पंधरा दिवसात नवीन पीक कर्ज वाटप व जुन्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी शेतकऱ्यांना समवेत बँकां समोर ठिय्या आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस परभणी आदींच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले...
0 टिप्पण्या