💥भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांवर गुंडाळला ; रोहित शर्माच्या सर्वाधिक 19 धावा....!


💥तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 78 धावांवर ऑल आऊट झाली💥

 ✍️ मोहन चौकेकर

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर पूर्णपणे आत्मसमर्पण केले. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडिया अवघ्या 78 धावांवर ऑल आऊट झाली. इंग्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे 9 खेळाडू दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. 

इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी तीन आणि सॅम कुरान आणि ओली रॉबिन्सनने प्रत्येकी दोन बळी घेतले. त्याचबरोबर रोहित शर्माने भारतासाठी सर्वाधिक 19 धावा केल्या. याशिवाय अजिंक्य रहाणेने 18 धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडा स्पर्श करू शकला नाही. याशिवाय अजिंक्य रहाणेने 18 धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडा गाढू शकला नाही....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या