💥वाशिम पोलिस विभागाची धुरा आता जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह सांभाळणार...!


💥जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांचे कडून बच्चन सिंह यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा स्विकारला पदभार💥 

फुलचंद भगत -

वाशिम:- राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस महासंचालक पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर प्रतिक्षाधिन पोलीस अधिकारी यांचे बदलीतील अडथळे दुर करुन विहित कालावधी पुर्ण झालेल्या राज्यातील पोलीस अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत . त्याचाच एक भाग म्हणुन दिनांक ० ९ / ० ९ / २०२१ रोजी वसंत परदेशी पोलीस अधिक्षक वाशिम यांची बदली होऊन बच्चन सिंह यांची जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम या पदावर नियुक्ती करण्यात आली.

                   गणपती उत्सवाचे सुरवातीलाच पोलीस अधिकारी यांच्या बदल्या झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणुन याकरीता आज दिनांक २० / ० ९ / २०२१ रोजी मा . पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी वसंत परदेशी यांचेकडुन जिल्हयाचा पदभार स्विकारला व जिल्हयाची सुत्रे हातात घेतली,जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी जिल्हयाची सुत्रे हातात घेताच सर्व ठाणेदार , सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी यांची सर्वसाधारण सभा घेऊन त्यांनी केलेल्या कामाबददल त्यांचे कौतुक केले तर त्यांना मोलाचे मार्गदर्शन देखील केले,याच बरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांचा देखील निरोप समारंभ संपन्न झाला.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या