💥राज ठाकरे हे एका दिवसाच्या ठाणे दौऱ्यावर असून त्यांनी कल्पिता यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली 💥
महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील फेरीवाल्यांविरोधात मंगळवारपासून जोरदार कारवाईला सुरुवात केली.
असं असतानाच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली आज राज ठाकरे हे एका दिवसाच्या ठाणे दौऱ्यावर असून त्यांनी कल्पिता यांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेदरम्यान सायंकाळी कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले या घटनेनंतर कासारवडवली पोलिसांनी फेरीवाला अमरजीत यादव याला अटक केली आहे याचसंदर्भात राज ठाकरे यांना पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी या फेरीवाल्याला मनसे सोडणार नाही असा इशारा दिला “पोलिसांकडून जेव्हा तो सुटेल तेव्हा तो आमच्याकडून मार खाईल यांची मस्ती उतरवली पाहिजे ह्यांची जेव्हा सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा त्यांना कळेल हिंमत कशी होते यांची.
आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो याने काही सुधारणारे लोक नाहीत यांची हिंमत ठेचलीच पाहिजे सरकारी अधिकाऱ्याची बोटं छाटता ? आज अटक झाली आहे उद्या जामीन मिळेल परत दुसऱ्याची बोटं तोडायला बाहेर येतील असं राज म्हणाले आहेत....
0 टिप्पण्या