💥भाजपा तर्फे तहसीलदार पल्लवी टेमकर यांना निवेदन देण्यात आले💥
पूर्णा (दिनांक १५ सप्टेंबर) ; ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या राज्यातील आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे आज बुधवार दि.१५ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात आले.या आदोलनाचाच भाग म्हणून आज पूर्णेतही भाजपा तर्फे तहसीलदार पल्लवी टेमकर यांना निवेदन देण्यात आले.
पूर्णा तहसील येथे १२-०० वाजेच्या दरम्यान भाजपच्या वतीने राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आले.यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बजगीर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बलिराम कदम,तालुकाध्यक्ष अनंतराव पारवे,शहराध्यक्ष प्रशांत कापसे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अजय ठाकुर,जिल्हा संयोजक विजय कराड,भारत एकलारे,ओबीसी तालुकाध्यक्ष शिवदास शिराले,नरहरी ढोने,युवा शहराध्यक्ष विश्व्नाथ होळकर,मारुति साखरे,गोविंद ठाकुर,रमन ओझा,विजय साखरे,देवानंद वलसे,राम पूरी,अजय गवली उपस्थित होते.कार्यक्रम यशसवी करण्या साठी ओबीसी तालुकाध्यक्ष शिवदास शिराले,शिवकुमार शिराले,शिदराम भालेराव,सुनील माइंडले,गंगाधर भोग,मारुति कुबड़े,राम कोलेकर,मोहन वाघमारे,नारबाची तेलंग आदिनी परिश्रम घेतले...
0 टिप्पण्या