💥शिबिरास उपस्थित राहून नागरिकांनी डोळ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाने होणाऱ्या तपासणीचा लाभ घ्यावा- डॉ.संतोष मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील श्रीनाथ हाँस्पीटल येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर ; " डोळ्यांची आधुनिक तंत्रज्ञानाने तपासणीचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.
मानवी विकासात डोळयाचे अपरंपार महत्त्व आहे.डोळा हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा रस्ता आहे. शहरातील श्रीनाथ हाँस्पिटल अरुणोदय मार्केट समोर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचे काँम्प्युटराईज्ड नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे.दि.२ डिसेंबर रोजी सकाळी १०ते २ वाजेपर्यंत शिबिराचा वेळ आहे.या शिबिरामध्ये नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची नवीन तंत्रज्ञान वापरून काँम्प्युटराईज्ड आधुनिक पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.तसेच, डोळ्यांच्या वेगवेगळ्या आजारांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.यामध्ये,डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे. मोतीबिंदू तपासणी, डोळ्यांची निगा कशी राखावी याची माहिती यामध्ये दिली मिळणार आहे. तपासणी सर्व मोफत असून,कसलेही शुल्क लागणार नाही. या शिबिरामध्ये तालुक्यातील व परिसरातील सर्व नागरिकांनी शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.असे, आवाहन शिबिराचे आयोजक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे....
0 टिप्पण्या