💥कोळसा या संस्थेचे अध्यक्ष भास्कराव बेंगाळ यांना 2022 चा हिंगोली भुषण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला....!


💥त्यांना 2022 चा हिंगोली भूषण गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला💥


✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली लोकप्रश्न व अखिल भारतीय मराठवाडा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ, कोळसा या संस्थेचे अद्यक्ष श्री.भास्कराव रामराव बेंगाळ यांना त्यांच्या क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विद्यार्थी घडवणारे शिक्षक व यशस्वी संस्थाचालक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 2022 चा हिंगोली भूषण गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.


      यावेळी मा.श्री. भाऊराव पाटील गोरेगावकर (माजी आमदार हिंगोली), मा.श्री.हेमंतभाऊ पाटील (खासदार हिंगोली लोकसभा), मा.श्री.चंद्रकांत राजूभैय्या नवघरे (आमदार वसमत), मा.श्री. तुकाराम रेंगे पाटील  (माजी खासदार परभणी), मा. श्री. शिवाजीराव माने (माजी खासदार हिंगोली), मा.श्री.दिलीप भाऊ चव्हाण (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हिंगोली),इतर मान्यवर उपस्थित होते.

          हा पुरस्कार श्री. भास्कराव बेंगाळ यांनी त्यांच्या कुटुंबांसमवेत स्वीकारला यामध्ये त्यांची पत्नी सौ.आनंदीताई बेंगाळ त्यांचा मुलगा अभिषेक बेंगाळ व मुलगी अभिलाषा बेंगाळ उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या