💥त्यांच्या निवडीचे अंबाजोगाई शहराच्या विविध क्षेत्रांतून स्वागत होत आहे💥
अंबाजोगाई (दि.०९ जानेवारी) - येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला चळवळीत आपले योगदान देणार्या श्रीमती सविताताई लक्ष्मण जाधव यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसपदी बीड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.संगीताताई कान्होबा तुपसागर (भोसले) यांनी नियुक्ती केली असून त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.त्यांच्या निवडीचे अंबाजोगाई शहराच्या विविध क्षेत्रांतून स्वागत होत आहे.
आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना सविताताई जाधव यांनी सांगितले की,महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर,बीड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ.संगीताताई कान्होबा तुपसागर (भोसले) यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात महिलांविषयीचे विविध प्रश्न यांची सोडवणूक करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेवून प्रयत्न करू,जास्तीत-जास्त महिला भगिनींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आणून महाविकास आघाडी सरकारच्या विविध लोकहिताच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोंचविण्याचे काम करू असे नुतन जिल्हा सरचिटणीस सविताताई जाधव यांनी सांगितले.....
0 टिप्पण्या