💥प्रहार जनशक्ती पक्षाने दिला होता आंदोलनाचा इशारा💥
परभणी - महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या प्रहार जनशक्ती पक्ष, परभणीच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी जलसंपदा विभाग शेतकर्यांच्या बांधावर* हा अभिनव राबविण्यास सुरुवात केली आहे. उपक्रमाअंतर्गत जिल्हयातील विविध सिंचन प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या कालवा, मायनर, कालव्या शेजारील रस्ते, कालव्यावरील पुल व शेत चाऱ्याच्या रखडलेल्या व प्रलंबित असलेली विविध कामे सुरु केली असून गाळाने भरलेल्या कालवा व मायनर साफ करून जिल्हयातील सिंचन वाढविण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.
याच उपक्रमाअंतर्गत परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द येथील निम्न दुधना उजव्या कालाव्यावरील पुलाच्या कामाबाबत प्रहार जनशक्ती पक्षाने माजलगाव कालवा विभाग क्र . १० च्या कार्यकारी अभियंतात्याकडे पाठपुरावा करुन मागील १२ वर्षापासून प्रलंबित असलेल्या पुलाच्या कामाला दि. १२ जानेवारी २०२२ रोजी सावंगी येथील जेष्ठ नागरीक श्री. किशनराव नवघरे व दिव्यांग दत्तराव रवंदळे यांच्या हस्ते भूमीपुजन करून सुरुवात करण्यात आली होती परंतू काम सुरु केल्यानंतर लगेचच राजकीय दबावाखाली पुलाचे काम जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने थांबविण्यात आले होते. या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग चोधने यांनी पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने माजलगाव कालवा विभाग क्र. १० चे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन पुलाचे काम तात्काळ सुरु न केल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. शिवाय संबंधीत प्रकरण जलसंपदा राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडु यांच्याकडे गेल्यानंतर मा.ना. बच्चुभाऊ कडू यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना तात्काळ काम सुरु करण्याबाबत फोनवरून सूचना दिल्या होत्या.
आज दि. ३१ जानेवारी २०२२ रोजी सावंगी खुर्द येथील राजकीय दबावाखाली थांबलेले कालव्यावरील पुलाचे काम सुरु करण्यात आले असून मागील १२ वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांची पुलाची मागणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होत आहे. कालव्यावरील या पुलाचा १० ते १२ गावांना फायदा होत असल्याने या गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा राज्य मंत्री मा.ना. बच्चूभाऊ कडू व प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत.
आज या पुलाच्या कामाची पहाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली त्यावेळी त्यांच्या सोबत युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, सावंगी खुर्दचे माजी सरपंच गुलाबराव पंढरकर, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर पुंजारे, मिडिया प्रभारी नकुल होगे व परिसरातील शेतकारी सर्व श्री माणिकराव पंढरकर, पंढरीनाथराव पंढरकर, आनंद पंढरकर, परमेश्वर पंढरकर, प्रशांत भुमरे, गणेश भुमरे, मोहन पंढरकर, कैलास पुंजारे, प्रदुम्न पंढरकर, भास्कर चोपडे, दत्तराव रवंदळे, सोपान गोपनवाड, संतोष पिसाळ, बाळासाहेब पंढरकर, अशोक चोपडे इ . उपस्थित होते...
0 टिप्पण्या