💥पुर्णा तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा प्रधानमंत्री आवास योजना यादीत समावेशासह पाच टक्के अपंग निधी तात्काळ वाटप करा...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची पंचायत समिती बिडीओ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी💥

पुर्णा (दि.२४ जानेवारी) - तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत तात्काळ समावेश करावा तसेच पाच टक्के अपंग निधीचे दिव्यांगांना तात्काळ वाटप करण्यात यावे अशी मागणी आज सोमवार दि.२४ जानेवारी २०२२ रोजी पुर्णा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पंचायत समितीच्या बिडिओ वानखेडे यांच्याकडे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के पिपंरणकर यांच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने एका निवेदनाद्वारे केली आहे.

पंचायत समिती बिडीओ वानखेडे यांना निवेदन देते वेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिस्टमंडळात बाबन ढोणे,राजेंद्र डाखोरे,बालाजी मोहिते,विठल घाटोळ,मचक कुरे,गजानन ढोणे आदींचा समावेश होता... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या