💥निवडून आलेल्या प्रभागातील विकासाऐवजी भ्रष्ट नगरसेवकांनी साधला स्वतःसह कुटुंबाचा आर्थिक विकास💥
पुर्णा नगर परिषदेच्या मागील २०१६ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक जाकीर कुरेशी व सुमन मधुकर गायकवाड यांनी सदरील प्रभागाच्या विकासा संदर्भात आपल्या कारकीर्दीत कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलले नसून संबंधित लोकप्रतिनिधींना या प्रभागातील जनतेला केवळ भुलथापा देण्याचे काम मागील पंधरा वर्षापासून चालवल्याचा गंभीर आरोप परिसराती युवक नेते राज नारायनकर युवा नेते नांगेश एंगडे तसेच रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे (आठवले गट) शहराध्यक्ष मिलिंद डिगांबर सोनकांबळे यांनी केला असून या संदर्भात बोलतांना युवा नेते राज नारायनकर म्हणाले की जनमतातून निवडून दिलेल्या प्रभागातील लोकप्रतिनिधींना विकासा संदर्भात प्रश्न विचारणे गुन्हा आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून श्री नारायनकर म्हणाले की मागील निवडणूकीत विद्यमान नगर सेविका सुमनबाई मधुकर गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार पद्मीनबाई नामदेव एंगडे यांचे सुपुत्र तथा युवा नेते नागेश एंगडे व रिपाई (आठवले गट) शहराध्यक्ष मिलिंद सोनकांबळे यांनी प्रभागातील मागील दहा वर्षापासून लाखो रुपयांच्या खर्चातून होणाऱ्या भिमनगर परिसरातील भैयासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाच्या अर्धवट कामा संदर्भात,आण्णाभाऊ साठे नगर परिसरातील मोडकळीस आलेल्या आण्णाभाऊ साठे समाज मंदिर व परिसरातील रस्ते नाल्या व पाणीपुरवठा संदर्भात प्रश्न उपस्थित का केला असे म्हणून नगरसेविका पती व पुत्राकडून त्यांच्यावर हल्ला करणे म्हणजे लोकशाहीचे ठोकशाहीत रुपांतर करण्याचा गंभी प्रकार असल्याचे नारायनकर म्हणाले.
यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना युवा नेते नांगेश एंगडे म्हणाले की प्रभाग क्रमांक सहा मधील जनसामान्यांच्या मतदानातून निवडून येणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी जाकीर कुरेशी व गायकवाड यांनी आपल्या कालावधीत प्रभागाचा यत्किंचितही विकास केलेला नाही विकासाच्या नावावर परिसरातील जनतेला भुलथापा देण्याचे काम मात्र सोईस्कररित्या केले प्रभागातील भिमनगर परिसरातील भैयासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाच्या कामासाठी लाखो रुपयांचा विकासनिधी उपलब्ध झाल्यानंतर सुध्दा अद्यापपर्यंत सभागृहाचे काम पुर्ण झालेले नाही तर याही पेक्षा दुर्दैवी बाब म्हणजे याच प्रभागातील आण्णाभाऊ साठे नगरातील साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे समाज मंदिर मोडकळीस आले असतांना या समाज मंदिराचे नुतनीकरण करण्याच्या भुलथापा मागील अनेक वर्षापासून देण्यात येत आहे परंतु अद्यापही या कामाला गती मिळालेली नाही मात्र विकासाच्या नावावर संबंधित नगरसेवकांनी स्वतःच्या कुटुंबाची मात्र भरपूर प्रगती केल्याचे निदर्शनास येत असल्याचेही एंगडे म्हणाले पुढे बोलतांना ते म्हणाले की सदरील प्रभागातील रस्ते नाल्यांचा प्रश्न ही गंभीर असून या प्रभागातील कुरैशी मोहल्ला येथील मस्जीद समोरील रस्ता तसेच बागवान गल्लीतील रस्त्याची झालेली दयनीय अवस्था अकार्यक्षम नगरसेवक कुरेशी व गायकवाड यांच्या निश्क्रिय कारभाराची साक्ष देत आहे.
यावेळी बोलतांना रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडियाचे शहराध्यक्ष मिलिंद सोनकांबळे म्हणाले की संबंधित प्रभाग क्रमांक सहाचे विद्यमान नगरसेवक जाकीर कुरेशी व गायकवाड यांनी प्रभागातील नागरी समस्यांचे निवारण करण्याऐवजी स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक उद्दारीकरणाचे धोरण राबवून प्रभागाच्या विकासासाठी आलेला आलेला कोट्ट्यावधी रुपयांचा विकासनिधी आवश्यकता नसलेल्या निर्मनुष्य ठिकाणी वापरून संपूर्ण प्रभाग भकास करण्याचे काम सोईस्कररित्या केले दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्ट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्रभागाच्या विकासासाठी वापरण्याऐवजी स्मशानभुमीत वापरल्याचे निदर्शनास येत असून बौध्द स्मशानभुमीत स्वच्छतागृह बांधकाम,पेवर ब्लॉक,टिनशेड आदींवर खर्च करून विकासनिधीची विल्हेवाट लावली हाच निधी प्रभागातील रस्ते नाल्यांसह पाणीपुरवठा योजना समाजमंदिर बांधकामांवर खर्च केला असता तर संपूर्ण प्रभाग विकसीत झाला असता असेही रिपाई नेते सोनकांबळे म्हणाले प्रभागाच्या विकासा संदर्भात वेळोवेळी प्रश्न उपस्थित केल्या मुळेच चिडून नगरसेवक पती व पुत्राने युवा नेते नागेश एंगडे व माझ्यावर हल्ला करून गुन्हे दाखल केले ही लोकशाहीची मुस्कटदाबी नव्हे काय ? असाही प्रश्न सोनकांबळे यांनी उपस्थित केला....
0 टिप्पण्या