💥37 वर्षच्या परंपरेने चालत आलेल्या मोहरम यात्रा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता....!


💥या सप्ताहमध्ये परभणी जिल्ह्याचे खासदार संजय (बंडू) जाधव यांची उपस्थिती💥

सचिन शिंदे - प्रतिनिधी

पूर्णा तालुक्यातील मुंबर येथे दि.०४ मे २०२२ रोजी सुरू झालेल्या मोहरम यात्रा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि.१४ मे २०२२ रोजी करण्यात आली.

  आगळे,वेगळे वैशिष्ट्य असलेला  सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारा मोहरम यात्रा निमित्त चालणारा अखंड हरिनाम सप्ताह देशातील विविधतेमध्ये एकता निर्माण करणारा जगाला शांततेचा व जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत भक्तीचा मार्ग पुढे नेणारा हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे ज्ञानदान रुपी अन्नदान यज्ञ आहे. मागील ३७ वर्षा पासून मोठ्या उत्साहात साजरा होत असलेला हा एक आनंद उत्सव आहे.दोन धर्माचे धार्मिक कार्यक्रम  एकेश्वराच्या छत्र छाये खाली होतात ही एक आश्चर्याची बाब आहे.

 या मोहरम यात्रा निमित्त चालणाऱ्या  सप्ताहाचा एकमेव उद्देश सर्व धर्म समभाव टिकविणे व संतांची एकरूपतेची व भक्तीमार्गाची शिकून पुढे येणे हा एकमेव उद्देश आहे.

मोहरम यात्रा निमित्त मुंबर येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद् भागवत कथा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात भागवत कथा प्रवक्ते श्री, ह.भ.प राम महाराज खोरसकर यांनी भागवत कथेचे निरूपण केले.कीर्तनकार श्री,ह.भ.प श्रीराम महाराज पिंपळेकर, श्री.ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पांचाळ पूर्णेकर, श्री.ह.भ.प अक्रूर महाराज साखरे गेवराई, श्री.ह.भ.प ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर,श्री.ह.भ.प वैजनाथ महाराज थोरात हिंगोली, श्री.ह.भ.प मधुकर महाराज सायाळकर, श्री.ह.भ.प विजय महाराज गव्हाणे यवतमाळकर, श्री.ह.भ.प बालासाहेब महाराज मोहिते परभणी ,व श्री,ह.भ.प राम महाराज मिरखेलकर यांचे पूजेचे किर्तन यांचे कीर्तन झाले     

   दि.११ मे २०२२ रोजी श्री,ह.भ.प अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे काल्याचे किर्तन झालेले व त्यानंतर गावांमध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्रीमद् भागवत कथेची भव्यदिव्य दिंडी सोहळा काढून या सप्ताहाची सांगता करण्यात आली.  सप्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण करुन सामाजिक बांधिलकीची जोपासना करत गरीब कुटुंबाचा मोफत विवाह सोहळा करण्यात आला. सामान्य जनतेच्या सेवेसाठी सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चाललेला आहे, अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे, त्यामुळे या सप्त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

या सप्ताहमध्ये परभणी जिल्ह्याचे खासदार मा.श्री संजय (बंडू) जाधव, श्री,व्हि. जी रामोड साहेब (सा.पो. निरीक्षक ताडकळस) श्री. ह.भ.प बालासाहेब मोहिते, श्री,विशाल कदम,श्री, कांतराव काका देशमुख झरीकर, राम काजळे  (मृदंगाचार्य), किशोर ढगे,पिंटू काळे,दिलिपराव अंभोरे, उद्धवराव काळे, गोविंदराव दुधाटे, प्रतापराव काळे,व्यंकटराव पौळ,पोलीस पाटील प्रकाशराव शिंदे, सरपंच अनंता शिंदे, उपसरपंच पांडुरंग शिंदे,राम पितळे,गोविंदराव शिंदे, गिरीधर शिंदे,पत्रकार सुरेश मगरे, सचिन शिंदे इत्यादी मान्यवर मंडळींनी भेटी दिल्या व खा, संजय (बंडू) जाधव साहेब यांनी खासदार निधीतून हनुमान मंदिराच्या सभामंडपासाठी 7 लक्ष रुपये निधी घोषित केला व ग्रामस्थांच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास पंचक्रोशीतील व बाहेर गावातील भक्त जन मंडळी व गावातील भजनी मंडळीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहरम यात्रा निमित्त चालणारा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या आनंदात व मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. पुढील वर्षांमध्ये गावातील सर्व जाती-  धर्मातील वधू-वरांचे मोफत विवाह सोहळा करण्यात येतील. पुढील वर्षांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दररोज सामाजिक उपक्रम साजरे केले जातील, मोफत विवाह सोहळा, सर्वरोग निदान व उपचार वृक्षलागवड, व्यसनमुक्ती इत्यादी सामाजिक उपक्रम साजरे करण्यात येणार असल्याचे हाजीसया संस्थानचे अध्यक्ष हभप. निवृत्ती महाराज शिंदे (देवकर) मुंबरकर यांनी सांगितले....

()

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या