💥यावेळी परिसराती शेकडो बुध्द ऊपासक,ऊपासिका,धम्मबांधव आणी मान्यवरांची ऊपस्थीती💥
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर शहरालगतच्या शहापुर येथील प्रबुध्द विहारात बुध्दजयंतीच्या पर्वावर सकाळिच बौध्द ऊपासक व ऊपासिका तसेच मान्यवसरांनी बुध्दवंदना घेवुन खिरवाटप केली.
अखिल विश्वाला शांती आणी समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुध्द यांच्या शिकवणुकीवर आजही समस्त जग सुरु आहे.अहिंसेचे विचार हे बुध्दांनी जगभर पेरले त्या विचारांची आजही जगाला आठवण येवुन गरज भासत आहे.बुध्दजयंतीचे पर्व सर्वञ मोठ्या ऊत्साहात पार पाडले जात आहे.मंगरुळपीर लगतच्या शहापुर येथील प्रबुध्द विहारातही सकाळीच बुध्दवंदना घेवुन बुध्दांच्या शिकवण आणी विचारांवर मान्यवरांनी आपल्या भाषणातुन प्रकाश टाकला.त्यानंतर खिरदान करण्यात आली.यावेळी परिसराती शेकडो बुध्द ऊपासक,ऊपासिका,धम्मबांधव आणी मान्यवरांची ऊपस्थीती होती.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या