💥जगाला युद्ध नको आहे महामानव भगवान बुद्धांचे विचार हवें आहेत......!


💥भदंत डॉ.उप गुप्त महाथेरो यांचे प्रतिपादन💥

पूर्णा :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महामानव भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ पूर्णा  च्या वतीने महामानव तथागत भगवान बुद्ध यांच्या 2563  च्या जयंती निमित्ताने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजनभदंत डॉ.उप गुप्त महाथेरो व भदंत पय्यावंश यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.सकाळी साडेपाच वाजता बुद्ध विहार येथे परित्राण पाठ व त्रिरत्न वंदना  पठन करण्यात आली सकाळी 9.30वाजता  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जेष्ठ धम्म उपसीका अनुसयाबाई गायकवाड यांच्या हस्ते पंचरंगी धममध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.


यावेळी या वेळी आपल्या प्रुमख धम्म देशने मध्ये संबोधित करताना भदंत डॉ.उप गुप्त महा थे रो यांनी भगवान बुद्ध ची विचाराची कार्याची महती विशद करताना  जगाला युद्ध न को आहे बुद्धांचे मानव मुक्तीचे विचार हवे आहेत बुद्धाच्या विचारानेच जगामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्तापित होऊ शकते.संपूर्ण मानव जात   शास्वत प्रगती करू शकते जपान राष्ट्र दुसऱ्या महा युद्ध मध्ये बेचिराख झाले होते बुद्धाचे विचार अंगिकारल्या मुळे आज ते राष्ट्र प्रगती पथावर आहे.


बुद्ध विहार या ठिकाणी भदंत डॉ उप उप गुप्त महा थेरो यांच्या हस्ते पंचरंगी धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्रिरत्ना वंदना व पूजापाठ झाल्या नंतर स्मुर्तिषेश सचिन अप्पा अशोक धबा ले  परिवार व राहुल गायकवाड मित्र  मंडळ  यांच्या कडून खीर दान व डॉ.गंगाधर कांबळे यांच्या कडून मिठाईचे वाटप करण्यात आले बुद्ध विहारा पासून धम्म रॅली चे आजोजन करून सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर धम्म सभेत झाले.

भदंत पायावंश यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका गयाबाई मुगाजी खंदारे यांच्या अध्यक्षते खाली झालेले या सभे मध्ये प्रमुख उपस्थिती नांदेड चे समाजकल्याण अधिकारी  राजू येडके ,सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सावंत प्राचार्य मोहनराव मोरे,आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैय्या खंदारे  जयंतीमंडळाचे अध्यक्ष गणेश सोनुले डॉ.बी. एस नरवडे डॉ संघमित्रा नरवाडे पोलिस अधिकारी मा रकड, गायकवाड हे होते.प्रास्ताविक भाषणं करताना प्रकाश कांबळे यांनी महामानव तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता स्वातंत्र्य विश्वबंधुत्व व न्यायाची शिकवण दिली .हे महान तत्व ज्ञान अंगीकार ल्या मुळे बौद्धअनुयायी यांची सर्वांगीण प्रगती झाली.या धम्म सभे मध्ये माता भगिनीची प्रचंड संख्येने उपस्थिती महा पुरुषांच्या विचाराचा अंगीकार केल्याचा परिणाम आहे.  

या प्रसंगी समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी बुद्ध धम्म प्रत्येकाने आचरणात आणावा .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र विचार आत्मसात करावे असे आव्हान केले. मिलिंद सावंत यांनी बुद्ध धम्म मधील शिकवण नैतिक मूल्य मानवी जीवन सुख कारक मानव जातीला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते   प्रा. मोहणराव मोरे  यांनी  भारतीय राज्य घटना अबाधित राहिली पाहिजे .राज्य घटने विरोधात बोलणाऱ्या समाज कंट कावर देश द्रोहाचा गुन्हा लावला पाहिजे.या प्रसंगी स्वरचित प्रेरणादायी गीत त्यांनी सादर केले

भदंत पयावंश यांनी दान पारमिता आर्य अष्टांगिक मार्ग चे महत्त्व विशद केले या कार्य क्रमात भदंत उपाली थे रो ग्रंथालयाचे ग्रंथ पाल यांना पुणे येथील विवेकानंद फाउंडेशन च पुरस्कार मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या वत्तीने विविध स्पर्धा मंजुषा ताई पाटील यांच्या सयोंजना खाली घेण्यात आल्या होत्या.

विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या सर्व कार्य क्रमाला जेष्ठ री.पा. इ.नेते यादवराव भवरे जेष्ठ नग र सेवक अनिल खर्ग ख राटे,कामगार नेते अशोक कांबळे,अशोक ध बाले,नगर सेवक ऍड हर्षवर्धन गायकवाड,धममदिप जोंधळे मधुकर गायकवाड मुकुंद भोळे भारतीय बौद्ध महासभेचे श्यामराव जोगदंड बाबाराव वाघमारे  विजय बगाटे  दिलीप गायकवाड अनिल पंडित प्रा.अशोक कांबळे,विजय जोंधळे मुकुंद पाटील पी.जी.रणवीर टी,झेड. कांबळे गौतम कांबळे बौद्धाचार्य त्रबक कांबळे अतुल गवळी उमेश ब ऱ्हा टे मोहन लोखंडे,आदींची उपस्थिती होती.कार्य क्रमाचे सूत्र संचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.कार्य क्रम यशस्वी करण्या साठी जयंती मंडळाचे विजय खंडागळे साहेब राव सोनवणे राहुल ध बाले चद्रमुनी लोखंडे राहुल पुंडगे प्रविन क नकुटे भीमा वाहुले सुरज जोंधळे प्रकाश जगताप सुनील खाडे आदींनी परिश्रम घेतले मोठ्या संख्येने या कार्यक्रमास  जन समुदाय उपस्थित होता....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या