💥दारु विक्रेत्यांशी संबंध ठेवणे पडले महागात💥
जिंतूर प्रतिनीधी / बी.डी. रामपूरकर
जिंतूर (दि.२२ मे २०२२) - जिंतूर पोसिस स्थानकात दाखल गुन्ह्यामध्ये चक्क वाईन शॉप मालकाला वाचविण्यासाठी तसेच जप्त केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी फिर्यादी म्हणून पोलिसाने फिर्याद बदलली. हा प्रकार पुढे आल्यानंतर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी जिंतूर पोलीस स्थानकातील पोलीस नाईक राजकुमार पुंडगे याला शासकीय सेवेतून निलंबीत केले आहे. या संदर्भात शुक्रवार १३ मे २०२२ रोजी आदेश निघाले आहेत निलंबनादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी जिंतूर हे मुख्यालय राहिल.जिंतूर पोलीसांनी दारु घेऊन जाणाऱ्या एका आरोपीला मोटारसायकलसह पकडले होते.
दारु विक्रेत्यांशी संबंध ठेवणे पडले महागात :-
अवैध दारू घेऊन जाणाऱ्या मोटारसायकल स्वारास मुद्देमालासह जिंतूर पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील वाईन शॉपच्या मालकाला वाचविण्यासाठी व गुन्ह्यात न दाखवण्यासाठी तसेच आरोपीकडून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी फिर्यादी म्हणून पोलीसाने फिर्याद बदलली पदाचा दुरुपयोग करुन मोटारसायकल आरोपीकडून तीन हजार रुपये घेऊन मोटारसायकल सोडून दिली. पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली. कर्तव्यामध्ये बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा केल्याचे उघड झाल्याने पोलीस नाईक राजकुमार पुंडगे याला शासकीय सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. या बाबत १३ मे रोजी पोलीस अधिक्षकांनी आदेश काढले आहेत. निलंबनादरम्यान कर्मचाऱ्याचे मुख्यालय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय जिंतूर हे राहणार आहे. पोलीस दलात काम करत असताना अवैध धंदे चालकांवर कारवाई करणे आवश्यक असते. मात्र पोलीस कर्मचारी त्यांच्याशी लागेबाधे ठेवून आर्थिक व्यवहार करत असल्याचे पुढे आले....
0 टिप्पण्या