💥परभणी मनपाने थातुरमातुर अतिक्रमण हटाव मोहिम न राबवता सरसकट सर्वच अतिक्रमणांसह अनाधिकृत बांधकाम हटवावे...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी💥

परभणी - शहर महानगरपालिकेच्या वतीने मागील २ ते ३ दिवसापासुन शहरातील रस्तेच्या कडेला असलेले अतिक्रमण काढण्याचे काम सुरु आहे. प्रहार जनशक्ती पक्ष परभणी शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या समर्थन करीत आहे . शहरातील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे परंतु परभणी शहर महानगरपालिका शहरातील अतिक्रमण काढत असताना नाल्यावरील ओटे व छोटयामोटया टपऱ्या काढून अतिक्रमण मोहिम राबविण्याचा डंका पिटत आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर अतिक्रमण झालेले असतानाही व अनेक वाहतुकीचे रस्ते पुर्णतः अतिक्रमणाच्या विळख्यात असतानाही केवळ धनधांडग्या लोकांचे संबंधीत अतिक्रमण असल्याने महानगरपालिका प्रशासन त्यांचे अतिक्रमण हटविण्याची हिमत करीत नाही. शहरातील अतिक्रमणे हटवायची असतील व शहरातील रस्ते मोकळे करायचे असतील तर नाल्यावरील अतिक्रमणासह अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमणात गायब झालेले वाहतुकीचे रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहिम राबविणे गरजेचे आहे परंतु असे न करता राजकीय दबाव व शहरातील धनदांडग्या लोकांच्या दबावाखाली केवळ धातुरमातुर अतिक्रण हटाव मोहिम म्हणजे महानगरपालिकेचा स्टंट आहे. असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला आहे.


आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊन. मनपाद्वारे शहरात थातुरमातुर अतिक्रमण हटाव मोहिम न राबवता शहरातील सरसकट सर्व अतिक्रमण व अनाधिकृत बांधकाम हटवा अशी मागणी करण्यात आली आहे धनधांडग्या लोकांकडुन चिरीमिरी घेऊन त्यांच्या अतिक्रमणाला पध्दतशीरपणे बाजूला ठेवण्याचा हा संतापजनक प्रकार आहे. सध्या शहरात सुरु असलेली अतिक्रमण हटावा मोहिमेला फक्त शहरातील सामान्य लोकांचे अतिक्रमण दिसते परंतू तत्कालीन जिल्हाधिकारी मा . श्री. एस.पी.सिंग साहेब यानी परभणी शहरामध्ये अतिक्रमीत जागा रेखांकित केल्या होत्या त्या रेखांकित केलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची हिंमत परभणी शहर महानगरपालिका प्रशासनात आहे का ? असा प्रश्न ही निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे.

 परभणी शहर महानगरपालिका प्रशासनास सूचित करून सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये केवळ नाल्यावरील ओटे व टपन्चा न हटवता शहरातील अनाधिकृत बांधकामे तत्कालीन जिल्हाधिकारी मा. एस . पी . सिंग साहेब यांनी रेखांकित केलेले अतिक्रमणे व अतिक्रमणामध्ये गायब झालेले वाहतुकीचे रस्ते मोकळे करण्यासंदर्भात सूचित करून परभणीकर जनतेला दिलासा द्यावा असे ही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शेख बशीर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या