💥या कारवाईत एकूण 18 लाखांचे साहित्य केले महसुल प्रशासनाने जप्त💥
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर
तालुक्यामध्ये महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत वाळूचे अवैध उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारी एक जूनी पोकलंड मशीन व एक बोट जप्त करुन तहसील कार्यालयात जमा केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारावर महसूल व पोलीस प्रशासनाने धडक कार्यवाही करीत जुनी वापरात असलेले टाटा हिताची कंपनीची एक पोकलंड मशीन (ईएक्स-70, 0703, 7652) अंदाजे किंमत 15 लाख रुपये व एक जुनी वापरात असलेली लोखंडी बोट अंदाजे किंमत 3 लाख रुपये अशा एकूण 18 लाखांचे साहित्य जप्त करत धडक कार्यवाही केली.
या कार्यवाहीमुळे तालुक्यातील अवैध वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मंडळ अधिकारी गजानन प्रभाकर कन्व यांनी दिलेल्या फिर्यादीत असेही नमूद केले आहे की पोकलंड मशीनच्या बकेटला व ब्लेडला वाळू चिकटलेली दिसून आली. याच ठिकाणाच्या 200 फूट अंतरावर एक लोखंडी बोट व त्या मध्ये सेक्शन पाईप व इंजिन बसवलेले दिसून आले. ही सर्व साधन सामुग्री जप्त करत जमीन महसूल संहिता कलम शासनाच्या 48 (7), (8) गुन्हा दाखल करून गुन्ह्या मधील पोकलंड मशीन, लोखंडी बोट जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले आहे.
या धडक कार्यवाहीच्या पथकात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, जिंतूर तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसिलदार ओमप्रकाश गौंड, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, मंडळअधिकारी गजानन कन्व, मंडळ अधिकारी प्रशांत राखे, (सेलू) तलाठी अनिल राठोड, पोलीस कंठाळे आदींचा समावेश होता.....
0 टिप्पण्या