💥पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील नरापूर शिवारातील सोनार नदीच्या पुलावर अज्ञात वाहणाने बैलगाडी चालकास उडवले...!

 


💥या घटनेतील गंभीर जखमी ५५ वर्षीय बैलगाडी चालक शेख गफूर शेख इस्माईल नांदेड येथील खाजगी रुग्नालयात दाखल💥


पुर्णा (दि.२८ मे २०२२) - पुर्णा-चुडावा-नांदेड राज्य मार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नसून या मार्गावर मागील एक महिण्याच्या कालावधीत अंदाजे सात ते आठ अपघात झाले असून सदरील राज्यमार्ग या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी जणूकाही मृत्यूचा मार्ग झाला की काय ? असा प्रश्न उपस्थित सदरील मार्गावरून रात्रंदिवस रेतीची तस्करी करणारी असंख्य टिप्पर हायवा तसेच आयशर सारखी जड वाहन चालक बेजवाबदारपणे सुसाट वेगाने वाहन पळवत असल्यामुळे या मार्गावरील गौर,नरापूर-चुडावा या गावातील गावकऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांना अक्षरशः जिव मुठ्ठीत घेऊन वावरावे लागत असून अशीच एक अपघाताची गंभीर घटना काल शुक्रवार दि.२७ मे २०२२ रोजी रात्री ०७-३० ते ०८-०० वाजेच्या दरम्यान या मार्गावरील गौर-नरापूर दरम्यान नरापूर शिवारातील सोनार नदीच्या पुलावर घडली असून या घटनेत पुर्णेहून चुडावा-नांदेडच्या दिशेने सुसाट वेगाने आपले वाहन पळवणाऱ्या बेजवाबदार अज्ञात वाहन चालकाने आपली बैलगाडी घेऊन नरापूरकडे शेतात जाणारे बैलगाडी चालक शेख गफूर शेख इस्माईल वय ५५ वर्षे राहणार गौर ता.पुर्णा यांच्या बैलगाडीला मागून जोरदार धडक दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून सदरील घटना घडताच अज्ञात वाहन चालकाने वाहनासह पोबारा केला असून जखमी बैलगाडी चालक शेख गफूर शेख इस्माईल यांना नांदेड येथील आधार हॉस्पिटल या खाजगी रुग्नालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे......

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या