💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाचे यश : दुधना नदीवरील हिंगला पुलाचे काम शेवटच्या टप्प्यात....!

💥येत्या पावसाळ्यात पुल वाहतुकीसाठी खुला होणार💥

परभणी - तालुक्यातील दुधना नदीवरील हिंगला पुलाचे काम मागील चार वर्षापासून बंद होते त्या मुळे हिंगला, वाडी दमई, पिपळा, मिर्झापूर, साडेगाव, सावंगी खुर्द, बोबडे टाकळी, पिंगळी कोथळा, जोड परळी या गावातील नागरिकांना परभणी ला येण्यासाठी २५ किलोमिटर चा अतिरिक्त प्रवास करून झरी मार्गे यावे लागते त्या मुळे वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.


अर्धवट अवस्थेत बंद असलेला पुल तत्काळ सुरू करावा या मागणी साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात या पुलावर दि. ०३ मार्च २०२२ रोजी " सुबुध्दी महायज्ञ " करून अनोखे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलना मुळे कुंभकर्णाच्या झोपेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले. संबंधित पुलाचे काम तत्काळ सुरू करा अन्यथा कार्यालयात साप सोडू असा इशारा आंदोलना दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिला होता तसेच येत्या पावसाळा अगोदर संबंधित पुलाचे काम पूर्ण होऊन १५ जून पूर्वी पुल वाहतुकीसाठी खुला होईल असे आश्वासन आंदोलनात सहभागी झालेल्या परिसरातील गावकऱ्यांना दिले होते. प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाची धास्ती घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हिंगला  पुलाच्या रखडलेल्या कामाला दि. २० एप्रिल २०२२ रोजी सुरुवात केली होती. आज ते काम अंतिम टप्प्यात आहे व येत्या पाच दिवसात पुलावरील छत टाकण्याचे काम पूर्ण होऊन हा पूल १५ जून २०२२ पर्यंत सामान्य जनतेच्या वाहतुकी साठी खुला केला जाईल असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रहार जनशक्ती पक्षास दिले आहे.

आज संबंधित पुलाच्या कामाची पाहणी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली त्यांच्या सोबत युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, हिंगला गाव चे सरपंच ज्ञानेश्वर अब्दागिरे, झरी सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, धर्मेंद्र तूपसमुंद्रे, धोंडीराम सोनकांबळे, हिंगला शाखा प्रमुख विष्णू गोल्डे, दत्तराव भोंग, रमेश काळे इत्यादी उपस्थित होते.

हा नुसता पुल नसून बंधारा आहे व त्या मुळे परिसरातील शेतकऱ्यांना या पुढे बारमाही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग वठणीवर आले. येत्या पावसाळ्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल हा प्रहार जनशक्ती पक्षाने परिसरातील गावकऱ्यांना दिलेला शब्द पाळला असून प्रहार जनशक्ती पक्षामुळेच दुधना नदीवरील चार वर्षापासून रखडलेल्या हिंगला पुलाचे काम पूर्ण होत असल्यामुळे हिंगला, वाडी दमई, पिपळा, मिर्झापूर, साडेगाव, सावंगी खुर्द, बोबडे टाकळी, पिंगळी कोथळा, जोड परळी, सनपुरी व करडगाव येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या