💥संभाजी सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे जयंती महोत्सवाचे करण्यात आले आयोजन💥
संभाजी सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी राजे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीराजे यांना मान्यवरांच्या हस्ते दुग्धाभिषेक, महापूजा करण्यात येणार असून गोंधळ्याचा संभळ वाजवून महाआरती करण्यात येणार आहे .मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमास शंभू प्रेमीनी उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर ,मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन लव्हाळे, मराठवाडा उपाध्यक्ष ओमप्रकाश लड्डा, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर सोळंके ,शहराध्यक्ष अरुण पवार, जिल्हा संपर्कप्रमुख नारायण देशमुख, जिल्हा संघटक विजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष सतीश जाधव, तालुकाध्यक्ष दौलत शिंदे, शिक्षण आघाडीचे अध्यक्ष प्रा सुभाष चव्हाण, प्रा श्याम सवंडकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सोनू पवार, आदींनी केले आहे.....
0 टिप्पण्या