💥वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे २९ मे रोजी भव्य नाथ समाज मेळाव्याचे आयोजन....!


💥राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते होणार मेळाव्याचे उद्घाटन💥

फुलचंद भगत

वाशिम :- नाथ समाज कार्यात अग्रस्थानी असलेल्या वैदर्भीय नाथ समाज संघ या नाथ समाजा साठी कार्य करणाऱ्या संस्था वजा संघटनेच्यावतीने दि.२९/०५/२०२२ रविवार ला कारंजा लाड जिल्हा वाशिम येथील बाबासाहेब धाबेकर सभागृह मुर्तीजापूर रोड कारंजा लाड येथे भव्य नाथ समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याचे विशेष म्हणजे सदर मेळावा हा समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच भव्य अशा स्वरूपात होतो आहे.

 त्यातही विशेष बाब म्हणजे आजतागायत नाथ समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील कुठल्याही सामाजिक कार्यक्रमात राज्यमंत्री दर्जाचे व्यक्तिमत्व आलेले नव्हते, परंतु सदर मेळाव्याचे उद्घाटन खुद्द विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे राज्यमंत्री बच्चु कडू हे करणार असून, विमुक्त जाती भटक्या जमाती चे नेते माजी वनमंत्री संजय राठोड आमदार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. ह्या मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील तळागळातील नाथ समाज एका ठिकाणी यावा व नाथसमाजाशी निगडित समस्यांचे  निवेदन दस्तुरखुद्द ,राज्य मंत्री महोदयांना ते द्यावे जेणेकरून ह्या समस्या शासकीय स्तरावर सोडविण्यास मदत होईल आणि सोबतच आपल्या उपवर मुला मुलींचा बायोडाटा सोबत घेऊन यावा. जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील उपवर वधूंची माहिती पुस्तिका अल्पदरात समाजाला पुरविण्यास मदत होईल. या मेळाव्याचा लाभ सर्व समाज बांधवांनी आवर्जून घ्यावा व दिनांक 29 मे रविवार रोजी होणाऱ्या ह्या भव्य मेळाव्यास सहकुटुंब हजेरी द्यावी असे आवाहन वैदर्भीय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या