💥श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यदक्षते मुळे त्यांना प्राचार्य म्हणून पुन्हा एकदा संधी दिली
पूर्णा (दि.१३ मे २०२२) - श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. राजकुमार यांनी प्राचार्य पदाची पाच वर्ष पूर्ण केली असून संस्थेने त्यांना प्राचार्य म्हणून फेरनियुक्ती दिली आहे. राजकुमार यांच्या कालावधीत महाविद्यालयाची चांगलीच भरभराट झाली.
कोरोनासारखी संकटे येवूनही त्यांनी शिक्षकांना ऑनलाईन माध्यमे वापरून अध्ययन अध्यापन सुरू ठेवायला सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही. त्यांच्या काळात महाविद्यालयास स्वारातीम विद्यापीठाकडून ग्रामीण भागातून उत्कृष्ट महाविद्यालयाचे प्रथम पारितोषिक मिळाले. विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा मिळाला तसेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच श्री गुरुबुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.के.राजकुमार यांना प्राचार्य म्हणून पुन्हा एकदा संधी दिली आहे. यावेळी श्री गुरु बुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री गुरु डॉ.नंदिकेश्र्वर शिवाचार्य महाराज, कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे, सचिव प्रा.गोविंद कदम, कोषाध्यक्ष उत्तमराव कदम, सहसचिव अमृतराज कदम, उपप्राचार्य डॉ.संजय दळवी, श्रीमती फातिमा शेख या सर्वांनी डॉ.के.राजकुमार यांचे अभिनंदन केले. स्टाफ सचिव प्रा. पांडुरंग भुताळे, स्थानिक स्वामुक्ता संघटनेच्या अध्यक्ष डॉ. पुष्पा गंगासागर, सचिव डॉ. विजय पवार तसेच सर्व शिक्षक कर्मचारी, श्री गिरीश शिवणकर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी डॉ.के.राजकुमार सरांचे अभिनंदन केले. सत्काराला उत्तर देताना डॉ राजकुमार यांनी संस्थेचे आभार मानले.....
0 टिप्पण्या