💥शेतकरी मिञ प्रल्हाद शेळके यांचा कार्यगौरव आणी नागरी सत्काराचे आयोजन...!




💥कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे💥

फुलचंद भगत

मंगरूळपीर:-शेतकर्‍यांचे प्रेरणास्थान म्हणून नावलौकीक असणारे पंचायत समिती मंगरूळपीर येथील मा.कृषी अधिकारी प्रल्हाद सदाशिवरावजी शेळके यांचा कार्यगौरव आणी नागरी सत्काराचे आयोजन रविवार दि.७ मे रोजी प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर यांची वाडी मानोरा रोड मंगरूळपीर येथे मा.श्री.एकनाथरावजी डवले (भाप्रसे) प्रधान सचीव(कृषी)महा.राज्य मुंबई यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तर वाशिम जि.प.चे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.

        कृषी क्षेञातील मौलीक माहीतीचा खजाना असणारे आणी त्या माहीतीच्या व्दारे परिसरातील शेतकर्‍यांच्या ऊत्पन्नाचा आर्थीक स्तर ऊंचावणारे सर्वपरिचित आणी मनमिळावू स्वभावाचे पंचायत समिती मंगरूळपीरचे कृषी अधिकारी प्रल्हाद शेळके हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे.त्यांच्या प्रशासनातील सेवेचा कालावधी बघता शेतकर्‍यांसाठी जणू दैवतच ठरलेले शेळके हे सतत शेतकर्‍यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहुन बळीराजा कसा सुखी होईल आणी विविध तंञज्ञानाचा वापर शेतीसाठी करुन भरघोस ऊत्पन्नाव्दारे आपला आर्थीक स्थळ शेतकरी कसा सूधारतील याविषयी नेहमी मंथन आणी मदत करणारे वरदानच परिसरातील शेतकर्‍यांचे होते.त्यांच्या प्रशासकीय आणी शेकर्‍यांप्रतीची सेवेची कृतज्ञता म्हणून कृषी सचीव एकनाथरावजी डवले व जी.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.७ मे सायंकाळी ५ वाजता मानोरा रोड,मंगरूळपीर येथे शेतकरी मिञ प्रल्हाद शेळके यांचा कार्यगौरव आणी नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख ऊपस्थीतीत मा.राज्यमंञी सुभाष ठाकरे,मा.मंञी मनोहर नाइक,मा.सभापती लक्ष्मीकांत महाकाळ,वाशिम जिल्हाधिकारी श्री.षन्मुखराजन एस,जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकारी वसुमना पंत,ऊपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार,कृषी अधिकारी विलास बंडगर,ऊपविभागिय अधिकारी सखाराम मुळे,ऊपविभागिय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे,तहसिलदार शितल बंडगर,मंगरूळपीर पं.स.चे सभापती हरिष महाकाळ,गटविकास अधिकारी सुरेश कांबळे,ता.कृषी अधिकारी रविंद्र इंगोले आदींची ऊपस्थीती राहणार आहे.सर्व शेतकर्‍यांनी या नागरी सत्काराला ऊपस्थीती दर्शवावी असे आवाहन आयोजक कार्यगौरव सत्कार सोहळा समितीने केले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या