💥अब...ब....तब्बल १ हजार २७ रक्त दात्यांनी केले रक्तदान💥
परभणी (दि.३१ मे २०२२) - परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त परभणी जिल्हा युवा सेनेच्या वतीने आज मंगळवार दि.३१ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल १ हजार २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात खा. संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ३१ मे रोजी युवा सेनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी १० वाजता या शिबिराचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे होते. तर उद्घाटक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, हृदयरोग तज्ञ डॉ.रामेश्वर नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम हे उपस्थित होते.
प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांनी अहिल्याबाई होळकरांच्या जीवनावर प्रकाश टाकून रक्तदानाचे महत्त्व विशद केले. व्यासपीठावर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, नगरसेवक अतुल सरोदे, दलित आघाडीचे जिल्हा संघटक संजय सारणीकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, उपजिल्हाप्रमुख प्रदीप भालेराव, अण्णा दिघोळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी केले.
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले. रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून १ हजार २७ पिशव्या रक्त जमा झाले.
शिबिरादरम्यान शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुधाकर खराटे, उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, माणिकराव आव्हाड, सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, पंढरीनाथ घुले दादाराव वाघ, प्रा. डॉ. मीनानाथ गोमचाळे, माणिक कदम, शिवा यादव, मनीष कदम, प्रभाकर वाघीकर, वीरेंद्र बांगर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक बारहाते, अर्जुन रन्हेर, नारायण खिस्ते, अमोल भिसे, पिराजी आहेरकर, संदीप देशमुख, सुभाष टाक, अभिजीत मुंडे, मुंजा कदम, पप्पू वाघ, पिंटू काळे, विजयसिंग ठाकुर, ओंकार शहाणे, संजय साखरवाड, जितेश गोरे, वसंत रेंगे, अमोल जाधव, सचिन मोटे आदींनी भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अर्जुन सामाले, प्रदिप भालेराव, शुभम पाष्टे, सुभाष माने, विकी पाष्टे, संतोष कांबळे, अमोल भालेराव, सचिन भोजने, तुषार सावंत, राहुल ठाकूर, सागर कर्नेवार, दिपक राठोड, अंकित शर्मा आदींनी विशेष परिश्रम घेतले. आयोजकांच्या वतीने रक्तदात्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
0 टिप्पण्या