💥पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गतच्या गुन्ह्यात आरोपीला अभय तर फिर्यादीची चौकशी..!


💥जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून चौकशीची मागणी💥

जालना, (प्रतिनिधीं) - पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई न करता त्याला अभय देऊन, फिर्यादी पत्रकाराचीच चौकशी करणाऱ्या अंबड पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यावर कारवाई करावी आणि आरोपीला अटक करावी, अशी मागणी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक देशमुख यांनी यावेळी दिले आहे.

------------------------------------------------------------------------

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी - एस.एम.देशमुख


पत्रकार संरक्षण कायद्यानुसार दाखल गुन्हा अजामीनपात्र आहे.. परंतू पोलीस अधिकारी पळवाट काढून गुन्हाच दाखल न करणे, गुन्हा दाखल केला तर आरोपींना अटकच न करणे असे प्रकार करीत असतात.. त्यामुळे लोकांना कायद्याचा धाक उरलेला नाही.. परिणामतः पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत.. म्हणूनच पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने वारंवार केली आहे.. 


संबंधित बातमी बघा.. बातमी जालना जिल्ह्यातील अंबडची  आहे.. पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला पण २० दिवस झाले आरोपी अजून मोकाट आहे.. अंबडचे पोलीस पत्रकाराचीच उलटतपासणी करीत आहेत.. या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावी अशी मागणी एस.एम देशमुख यांनी केली आहे.. 

------------------------------------------------------------------------

यासंदर्भात जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने आज अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि,  अंबड येथील साप्ताहिक जनमताचा आवाजचे संपादक सिद्धेश्वर उबाळे यांना बातमी छापल्याच्या कारणावरून २९ एप्रिल २०२२ रोजी बेदम मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या . याप्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा कलम ४ आणि भादंवि. ३२३, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज गुन्हा दाखल होऊन, २० दिवसाचा कालावधी उलटला आहे. मात्र आरोपीला पोलिसांनी अटक देखील केलेली नसून तो खुलेआम फिरत आहे. त्यामुळे  फिर्यादी पत्रकाराच्या जीवितास आरोपीकडून धोका आहे. तसेच, अंबड पोलिसांनी आरोपीस अटक करता त्याला अभय देऊन, उलट फिर्यादी पत्रकाराचीच उलट तपासणी आणि चौकशी सुरु केली आहे. 

या निवेदनावर जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फकिरा देशमुख, कार्याध्यक्ष किशोर आगळे, सरचिटणीस नारायण माने, उपाध्यक्ष अभयकुमार यादव, दिनेश जोशी, कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, चिटणीस शेख मुसा, धनंजय देशमुख, अंबड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जिगे, सिद्धेश्वर उबाळे, शेख फारुख, नाजीम सय्यद, श्रीधर कापसे यांच्यासह पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️✍🏻

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या