💥विहिरीत पडलेल्या नीलगाईला शेतकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलं आहे💥
💥अशोक गुंजकर शेतकऱ्यांचे वन्य प्रेमी व गावकऱ्यांकडून कामगिरीबद्दल कौतुक होत आहे💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
सेनगांव तालुक्यातील पानकनेरगांव येथे हा सुटकेचा दोन तास थरार बघायला मिळाला. आशोक गूंजकर यांच्या शेतातील विहिरीत दोन नीलगाय पडली होती. याची माहिती मिळताच अशोक गुंजकर यांनी नेहमीप्रमाणे शेतातील विहिरीकडे धाव घेतली. दोन निलगाय विहिरीत पडलेल्या चे आढळून आले तात्काळ एक तरूण विहिरीत दोरखंडाच्या साह्याने उतरला. त्याने नीलगाईला बाहेर काढले. या साहसी कामगिरीबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक होत आहे.
सध्या खूपच उष्ण वातावरण आहे सध्या तापमान 40 अंश सेल्सियस वर असल्याने माणसांबरोबरच प्राणीमात्रावर देखील या उष्णतेचा परिणाम होत आहे. उष्णतेमुळे बऱ्याच भागांमधील पाणी पूर्णं आटले आहे. त्याचा परिणाम म्हणून डोंगराळ भाग व जंगलामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे प्राणी आता पाण्याच्या शोधात मानवी वस्ती व विहिरीत धाव घेत आहेत.
अशातच दिनांक 29 मे रोजी शेतकरी अशोक गुंजकर यांची डोंगराळ भागात शेती आहे ते नेहमीप्रमाणे शेतात गेले असता येथील अशोक गूंजकर यांच्या शेतामधील विहिरीमधे निलगाय जातीची वन्यप्राणी विहिरीत पडलेले आढळून आले तेव्हा त्यांनी त्वरित वनविभाग अधीकारी शिंदे यांनी संपर्क केला.
पण मात्र वनविभाग अधीकारी शिंदे हे बाहेरगावी असल्याचं सांगून हि काढण्याची व्यवस्था लावतो कर्मचारी पाठवतो परंतु वेळ कमी असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत पडलेले नीलगाई पाण्यात तरफड होते सदरील त्याची तरफड पहावी वाटत नसल्याने त्यांनी तात्काळ दोरखंडाच्या साह्याने बाजूच्या स्थानिक शेतकऱ्याला हाताशी घेऊन अशोक गुंजकर यांनी दोन निलगाईना संयुक्त प्रयत्नातून सुखरूप बाहेर काढले त्यामुळे दोन निल गाईंना जिवदान मिळाले त्यामुळे त्यांचे वन विभाग व वन्य प्रेमी यांच्याकडून कामगिरीबद्दल कौतुक होत आहे.
पानकनेरगांव हा डोगराळ भाग असल्याने वन्य प्राणी चा वावर जास्त आहे त्यामुळे येथे पानवठे उभारण्याची गरज आहे जेधे करून वन्य प्राणी पाण्याच्या शोधात असलेल्या घटना घडणार नाही यांची वनविभागानी तात्काळ दखल घेऊन पानवठे उभारण्याची मागणी शेतकरी व प्राणी प्रेमी यांच्याकडून केली जात आहे.....
0 टिप्पण्या