💥पुर्णा नगर परिषदेत 'गाढवांचा गोधळ अन् लातांचा सुकाळ' ? घोटाळेबाजांच्या गळ्यात प्रशासकीय अधिकारी पदाची माळ....!


💥प्रशासकांच्या काळात बोगस कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हस्तांतर नामांतरासह घोटाळ्यांमध्ये वाढ💥 

पुर्णा :- पुर्णा नगर परिषदेचा कारभार एकंदर 'गाढवांचा गोंधळ अन् लातांचा सुकाळ ? अकार्यक्षम प्रशासक आणि घोटाळेबाजांच्या गळ्यात प्रशासकीय अधिकारी पदाजी माळ' अश्या पध्दतीचा झाल्याचे निदर्शनास येत असून बोगस कागदपत्रांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षरी मारून नामांतरासह मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरण देखील एक एक करून उजेडात येत असून असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आले असून वारसाची पुर्व परवानगी न घेता बोगस स्वाक्षरीच्या आधारे मालमत्ता क्र.३/६/७३ हे घर नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांनी एका महिलेच्या नावाने परस्पर लावल्यामुळे संबंधित घराचे वारसदार प्रेमकुमार दत्तराव पाटील हे दि.२४ मे २०२२ रोजी नगर परिषदे समोर आमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज शुक्रवार दि.२७ मे रोजी चौथा दिवस असतांना भर उन्हात उपोषणास बसलेल्या संबंधित उपोषणार्थी पाटील यांच्या उपोषणाकडे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्यासह कुठलाही अधिकारी फिरकलाच नाही त्यामुळे त्यांची प्रकृर्ती खालावल्यामुळे त्यांना चक्क त्यांच्या नातेवाईकांनी आज नगर परिषद प्रशासकीय इमारतीतील आवक/जावक विभागाच्या कार्यालयात आणून टाकले यावेळी संबंधित उपोषणार्थी यांनी माझा तब्बेत खालावल्यामुळे मला रुग्नालयात पाठवा अशी विनंती केल्यानंतर देखील त्यांची कोणी दखल घेतली नाही कारण नगर परिषदेत मुख्याधिकारी नरळे प्रशासकीय अधिकारी सय्यद इमरान आस्थापणाचे ओएस नंदलाल चावरे यांच्यासह कोणताही जवाबदार अधिकारी उपस्थित नसल्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेणार तरी कोण ? 


उपोषणार्थी प्रेम दत्तराव पाटील यांचे वडीलोपार्जीत घर क्र.३/६/७३ या संपत्तीचे त्यांची पुर्व परवानगी न घेता खोटी स्वाक्षरी व बोगस कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरण करणाऱ्यांनी त्यांच्या आक्षेपा नंतर पुन्हा त्यांच्या घराचे हस्तांतरण रद्द केले असले तरीही अश्या प्रकारे आर्थिक देवाणघेवाणीतून नगर परिषदेतील भ्रष्टाचारी अधिकारी/कर्मचारी कुठवर लोकांच्या संपत्तीची विल्हेवाट लावणार अन् अश्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी कुठवर वाचवणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या