💥निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आदेश जारी💥
हिंगोली : राज्य निवडणूक आयोगाने दि.29 एप्रिल,2022 रोजी निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोट निवडणुकीसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम घोषित केलेल्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे. त्या फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत मतदान केंद्रावर तसेच दि. 06 जून, 2022 रोजी हिंगोली येथील तहसीलदार यांचे कक्ष तहसील कार्यालय, औंढा नागनाथ येथील तहसील कार्यालयातील महसूल शाखा हॉल क्र. 2 येथे आणि वसमत येथील तहसीलदार यांचे कक्ष तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. त्या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
वरील मतदान केंद्राच्या ठिकाणापासून 100 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन तसेच संबंधित पक्षाचे उमेदवाराचे चिन्हाचे प्रदर्शन करणे या करिता दि. 05 जून, 2022 रोजीचे सकाळी 7.30 वाजेपासून ते दि. 06 जून, 2022 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे.
हे आदेश मतदान करणाऱ्या मतदारास व निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत. हा आदेश निवडणुकीचे कामे हाताळताना आणि कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मतदानाची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिसांनी जाहीर करुन त्यास प्रसिध्दी द्यावी, असेही जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी आदेशित केले आहे....
0 टिप्पण्या