💥जंगलात पर्यावरण दिन आज झाडे लाऊन करण्यात आला साजरा💥
शिवशंकर निरगुडे : हिंगोली
आज दि 05/06/2022 रोजी बोरखेडी पिनगाळे येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला बोरखेडी पिनगाळे येथील फॉरेस्ट विभागातील जंगलात आज पर्यावरण दिन झाडे लाऊन साजरा करण्यात आला आहे.
आज आपन 5 जुन हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हुणन साजरा करतो पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे समस्या व संवर्धनाविषयी जागरूगता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हुणन पोषण वातावरणाची निर्मीती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे
आज बोरखेडी पीनगाळे येथील फॉरेस्ट विभागाच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आहे या वेळी उपस्थितीत फॉरेस्ट विभागाच्या वनरक्षक शेलार मैडम .संदीप पिनगाळे पोलिस पाटील मा .सरपंच उकंडी पिनगाळे व गावातील ग्रामस्थाच्या वतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आहे....
0 टिप्पण्या