💥नगराध्यक्षा सौ.ज्योतीताई जगदीश देशमुख यांनी मानले आमदार संतोष बांगर यांचे आभार💥
शिवशंकर निरगुडे ; हिंगोली
शिवसेनेचे हिंगोली जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोषदादा बांगर यांच्या प्रयत्नातून सेनगांव नगरपंचायतला विविध विकासकामा करीता ४ कोटी रुपये निधी मंजुर झाला असून सेनगांवच्या सर्वांगीन विकासासाठी कट्टीबध्द असल्याचे सांगितले.
सेनगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.ज्योतीताई जगदीश देशमुख व उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपंचायत विकास कामासाठी आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोषदादा बांगर यांच्या प्रयत्नातून ४ कोटीचा निधी मंजूर झाला असून यामध्ये प्रभाग क्र.९ मध्ये ओपन पेस (केशवराव देशमुख लेआऊट) विकसीत करण्यासाठी १५ लाख,प्रभाग क्र.११ मध्ये मेनरोड ते गट्टाणी सी.सी.रस्ता बांधकाम करणे १५ लाख,प्रभाग क्र.११ मध्ये गांवडे सर ते मते सर ते ठेंगल नालीवरील धापा बांधकाम करणे १५ लाख,प्रभाग क्र.११ मध्ये इंगोले-पाटील ते भगवान गाढवे सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे १५ लाख,आजेगांव टि पाँईंट ते नागनाथ मंदीर सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे १ कोटी ४६ लाख व प्रभाग क्र.१७ मध्ये सी.सी.व नाली बांधकाम करणे ३५ लाख रुपये अशा विविध विकास कामासाठी निधी मंजुर झाला आहे...
0 टिप्पण्या