💥जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक कलासागर यांनी जारी केले आदेश💥
सोशल मिडीयावर कोणत्याही धर्म किंवा व्यक्ती विरोधात भावना दुखावणाऱ्या आपत्तिजनक पोस्ट टाकल्यास किंवा कायदा हातात घेतल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी काल १० जुन २०२२ रोजी रात्री उशीरा निर्माण झालेल्या तनावाच्या पार्श्वभूमीवर दिली.
शहरात आज शनिवार दि.११ जुन २०२२ रोजी सकाळी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी नागरिकांना आवाहन केले असून नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सोशल मिडीयाचा वापर करावा कोणत्याही जाती,धर्म,वंश किंवा महापुरुषांचा अपमान होईल किंवा दोन समाजात कटुता निर्माण होईल अश्या वादग्रस्त पोस्ट फारवड करू नये असे देखील आवाहन जि.पो.अ.कलासागर यांनी केले आहे.
जिल्ह्यात सोशल मिडियावर अफवा फैलावून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर हिंगोली पोलिस दलाच्या सायबर सेलची करडी नजर असल्याचेही ते म्हणाले....
0 टिप्पण्या