💥शहरातील राजकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान तेजस्वी सुर्य ॲड.राजेश भालेराव यांचा आज १३ जुन रोजी अभिष्टचिंतन सोहळा💥
पुर्णा तालुक्यातील विधिज्ञ प्रतिष्ठित व्यापारी तथा शहरातील कर्तव्य कर्तृत्व अन् स्वाभिमान सदैव कायम ठेवून अगदी स्वच्छ निर्मळ मनाने आपल्या परिसरातील नागरी समस्यांचे निराकरण करणारे राजकारणी व आपल्या कर्तृव्याशी एकनिष्ठ राहणारे पुर्णा नगर परिषदेतील अत्यंत संयमी बुध्दीमान शिवसेना नगर सेवक ॲड.राजेश विष्णूकांतजी भालेराव यांनी आपल्या कारकिर्दीत त्यांच्या प्रभागातील नागरी समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांच्या समस्यांचे निराकरण करून न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे विरोधकांसह तथाकथित हितचिंतकांच्या देखील हृदयात अक्षरशः धडकी भरल्याचे निदर्शनास येत असून या तेजस्वी सुर्याला झाकण्याची केविलवानी चेष्टा करणाऱ्यांनी एक गोष्ट निश्चितच लक्षात घ्यावी कर्तृत्ववान व्यक्तीच्या कर्तृत्वाला जनसामान्यांचे जेवढे खंबीर पाठबळ मिळत असते तितके पाठबवळ अकार्यक्षम कर्तृत्वशुन्य लोकांना कद्दापी मिळत नसते.
याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिवसेना नगर सेवक ॲड.राजेश भालेराव सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या तेजस्वी सुर्याकडे कुठलेही काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे समाधान कसे होईल याची जवाबदारी यशस्वीपणे पार पाडीत ८०% समाजकार्य व २०% राजकारण अश्या पध्दतीचा अवलंब करून हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा अवलंब करीत आपल्या प्रभागासह संपूर्ण तालुक्यातील जनसामान्यांना वेळोवेळी न्याय देण्याचा प्रयत्न ॲड.राजेश भालेराव यांनी केल्यामुळे त्यांना चाहणारा वर्ग प्रत्येक जाती-धर्मात निर्माण झाला आहे.
आज सोमवार दि.१३ जुन २०२२ रोजी या कर्तृत्ववान धाडसी अन् बुध्दीमान व्यक्तीमत्वाचा अभिष्टचिंतन सोहळा अर्थात वाढदिवस असल्याने असंख्य मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या व राजासारखे मन असलेल्या ॲड.राज भालेराव यांना अगदी मनापासून वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा...
0 टिप्पण्या