💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे १ जुलै रोजी कृषी दिनाचे आयोजन....!


💥कृषि क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा परभणी विद्यापीठाकडून होणार सन्मान💥

पुर्णा/धानोरा काळे/ प्रतिनिधी

      सामुदायिक विज्ञान महाविद्यालय वनामकृवी परभणी,कृषी विभाग तालुका पूर्णा,महिला आर्थिक विकास महामंडळ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने धानोरा काळे( ता.पूर्णा) येथे १ जुलै शुक्रवार रोजी सकाळी १०:०० वाजता कृषी दिनाचे आयोजन केले असून यात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी,शेतकऱ्यांना मार्गदर्शन,तसेच कृषी क्षेत्रातील  कर्तृत्ववान महिला शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


               या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता कृषी वनामकृवि परभणी डॉ. धर्मराज गोखले तर प्रमुख अतिथी म्हणून पूर्णेच्या तहसीलदार पल्लवी टेमकर, जिल्हा समन्वयक अधिकारी माविम परभणी बाळासाहेब झिंजाडे,पूर्णा तालुका कृषी अधिकारी रामचंद्र तांबिले, उद्यान पंडित शेतकरी प्रताप काळे, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य सामुदायिक विज्ञान महाविद्यालय परभणी डॉ. जया बंगाळे, विषय प्रमुख डॉ. शंकर पुरी आदी  उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास धानोरा काळे व परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामुदायिक विज्ञान महाविद्यालय वनामकृवि परभणी यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या