💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नांना यश निम्न दुधना कालव्या शेजारच्या मटकऱ्हाळा ते आनंदवाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात..!


💥शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्याकडे लेखी स्वरुपात विनंती अर्ज केला होता💥

परभणी (दि.०९ जुन २०२२) - तालुक्यातील मटकऱ्हाळा येथील परंपरागत असलेला मटकऱ्हाळा ते आनंदवाडी शेतरस्ता हा मागील अनेक वर्षापासून बंद असल्याने या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना निम्न दुधना डाव्या कालव्यावरील ७७ नंबरच्या उप कालव्यालगतच्या रस्त्यावरून जाणे येणे करावे लागत होते. परंतु हा रस्ता देखील अनेक वर्षापासून देखभाल न झाल्याने वाहतुकीस अयोग्य झाला होता शिवाय कालव्या लगतचा रस्ता खचल्याने कालव्याचे पाणी रस्त्यावरून वाहत होते.

 मटकऱ्हाळा ते आनंदवाडी व पुढे बोबडे टाकळीपर्यंत जाणारा कालव्या लगतचा हा रस्ता जलसंपदा विभागाचा रस्ता असल्याने संबंधीत रस्ता दुरुस्त करून देण्याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्याकडे लेखी स्वरुपात विनंती अर्ज केला होता त्या विनंती अर्जाची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी माजलगाव कालवा क्र. १० चे कार्यकारी अभियंता श्री. प्रसाद लांब यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली होती शिवाय कार्यकारी अभियंता, प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी तसेच परिसरातील तक्रारकर्ते शेतकरी यांनी संबंधीत कामाची संयुक्त स्थळ पाहणी देखील करण्यात आली त्यानुसार आज दि. ०९ जून २०२२ रोजी निम्न दुधना प्रकल्पावरील डाव्या कालव्याच्या ७७ नंबर उप कालव्या लगतच्या मटकऱ्हाळा ते आनंदवाडी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.या कामाचे भुमीपुजन मटकऱ्हाळा गावचे जेष्ठ नागरीक श्री. शिवाजीराव ( टेलर ) गरुड व भागवतराव गरुड यांच्या हस्ते मशीन ची पूजा व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

यावेळी प्रहार जनशकी पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, मटकऱ्हाळा शाखा प्रमुख उध्दव गरुड़, शहर चिटणीस वैभव संघई, माऊली मंजाजी गरुड, पांडुरंग गरुड, संदिप राऊत हनुमान गरुड, सुभाष गरुड़ , बाळू गरुड , बबन येडे , सुनिल गरुड, बाबुराव गरुड व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कालव्या लगतच्या जलसंपदा विभागाच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना थेट शेतापर्यंत जाण्याचा पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री मा.ना. बच्चुभाऊ कडू व प्रहार जनशक्ती पक्ष परभणीचे आभार व्यक्त केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या