💥पुर्णा नगर परिषदेत बोगस कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरणासह नामांतर ?


💥प्रकरणातील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर मुख्याधिकारी कारवाई केव्हा करणार ?💥

पुर्णा (दि.१३ जुन २०२२) - पुर्णा नगर परिषद अक्षरशः घोटाळ्यासह घोटाळेबाजांची तारणहार झाल्यामुळे एकामागून एक घोटाळे उघड झाल्यानंतर देखील या घोटाळेबाज अधिकारी/कर्मचाऱ्यांवर घोटाळेबाजांचे तारणहार वरिष्ठ अधिकारी थातुरमाथूर चौकशी करून पडदा टाकत असल्यामुळे घोटाळेबाज अधिकारी/कर्मचारी अक्षरशः छातीठोकपणे घोटाळ्यांची मालिका चालवत आहेत.

शहरातील शासकीय गायरान जमीन असो की एखाद्याची खाजगी मालमत्ता बोगस कागदपत्रांच्या आधारे परस्पर नगर परिषदेच्या रिव्हिजन रजिष्टरला नोंद करून त्या जागेची विल्हेवाट लावण्याची असंख्य प्रकरण उजेडात आली असून शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील सर्वे नं.१४ या तब्बल जवळपास ३० एक्कर शासकीय गायरान जमिन भुखंड माफीयांनी नगर परिषदेतील भ्रष्टाचारी अधिकारी/कर्मचाऱ्यांना हाताशी धरून संपूर्णपणे विल्हेवाट लावली आहे सदरील भुखंडा संदर्भात राज्याचे मंत्री अब्दूल सत्तार व गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी विभागीय आयुक्ताकडे तक्रार दिल्यानंतर आयुक्त तसेच जिल्हाधिकारी गोयल यांच्या आदेशानुसार भुमिअभिलेक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून रितसर मोजणी तर झाली मात्र कारवाई अद्यापही गुलदस्त्यातच असल्यामुळे 'शंकेची पाल चुकचुकतांना दिसत आहे' 

यानंतर देखील बोगस कागदपत्रांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षरी मारून नामांतरासह मालमत्ता हस्तांतरणाची प्रकरण थांबली नसून असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आले असून वारसाची पुर्व परवानगी न घेता बोगस स्वाक्षरीच्या आधारे मालमत्ता क्र.३/६/७३ हे घर नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांनी एका महिलेच्या नावाने परस्पर लावल्यामुळे संबंधित घराचे वारसदार प्रेमकुमार दत्तराव पाटील हे दि.२४ मे २०२२ रोजी नगर परिषदे समोर आमरण उपोषणास बसले होते या प्रकरणी मुख्याधिकारी अजय नरळे व प्रशासकीय अधिकारी बाबर यांनी त्यांना लेखी कारवाईचे आश्वासन देवून उपोषण तर उठवले परंतु या प्रकरणातील दोषींवर अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे या प्रकरणी प्रेमकुमार दत्तराव पाटील हे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे समजते.....

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या