💥बियाणे उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करून योग्य वेळी योग्य खोलीवर व योग्य ओलावा असताना बियाणे पेरा....!


💥कृषी सहाय्यक रजनीकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन💥 

खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी शेतीची मशागत करण्यात व्यस्त आहेत दरम्यान पिक उत्पादन वाढीसाठी पेरणीपूर्व योग्य नियोजन करावे तसेच घरच्या घरी सोयाबीन बियाणाची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी व घरच्या घरी बियाण्याची उगवन क्षमता तपासली असता ७० टक्के वर बियाणे उगवल्यास पेरणीसाठी योग्य समजावे तसेच कृषी सहाय्यक रजनीकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांना सांगताना सोयाबीनची बीजप्रक्रिया करावी व पेरणी करताना योग्य खोलीवर योग्यवेळी योग्य ओलावा असताना पेरणी करावी. 

तसेच घरच्या घरी लिंबोळी अर्क तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले महाडीबीटी योजनेतुन सर्व शेतकऱ्यांनी ठिबक तुषार व यांत्रिकीकरना तुन  ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलीत औजारे व इतर बाबीचे ऑनलाईन अर्ज करावेत तसेच मग्रारोहयो फळबाग लागवड योजने विषयी सविस्तर मार्गदर्शन केले व सदर फळबाग योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने कृषी सहायक श्री.रजनीकांत देशमुख यांनी सर्वं शेतकरी बांधवाना केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या