💥परभणी जिल्ह्यात बोगस बांधकाम कामगार नोंदणी करणाऱ्या टोळ्या कार्यरत ; जिल्हा बांधकाम अधिकाऱ्यांचा हिरवा कंदिल ?


💥जिल्ह्यात पुर्णा तालुका आघाडीवर : न.पा. मुख्याधिकारी/संस्थाचालकांच्या खोट्या स्वाक्षरीसह बनावट शिक्क्यांचाही वापर💥

परभणी : राज्य शासनासह केंद्र शासनाकडून बांधकाम कामगार रोजमजूरांच्या सर्वांगीन विकासासाठी विविधषशासकीय योजना अंमलात आणल्या असून या योजनांचा लाभ गोरगरीब बांधकाम कामगार रोजमजूरांपर्यंत पोहोचण्याऐवजी या योजनांचा लाभ बोगस कागदपत्रांच्या आधारे आर्थिकदृष्ट्या प्रबळ लोकच घेऊ लागल्याचे निदर्शनास येत असून या गंभीर प्रकरणात शासकीय अधिकारी/कर्मचारी देखुल आपले हात ओले करून घेत असल्याचे उघड झाले असून परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बोगस कागदपत्रांच्या आधारे तसेच ९० दिवस कामाचे नकली नोंदणीकृत शिक्क्यांचा वापर तसेच अधिकाऱ्यांसह कामगार संस्था चालकांच्या खोट्या शिक्क्यांसह स्वाक्षरींचा वापर करून जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय परभणी शेकडो बोगस बांधकाम कामगारांच्या नोदण्या करून शासकीय योजनांची विल्हेवाट सोईस्कररित्या लावल्या गेल्याचे गंभीर प्रकरण समोर आले असून या प्रकरणात जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचे समोर येत आहे.


जिल्ह्यात बोगस बांधकाम कामगार नोंदणी करून शासकीय योजनांची सोईस्कररित्या विल्हेवाट लावणाऱ्या टोळ्याच कार्यरत झाल्याचे निदर्शनास येत असून यात पुर्णा तालुका आघाडीवर असल्याचे दिसत आहे अन्नाभाऊ साठे सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था फुलकळस तालुका पुर्णा जि.परभणी रजि.नं.पि.बी.एन/पि.आर.एन/जी.एन.एल/२०/२०१८ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माधव दुधगोंडे यांची कुठलीही पुर्व परवानगी न घेता बोगस शिक्के तयार करून ९० दिवस कामाचे कामगाराचे बोगस प्रमाणपत्र जिल्हा कामगार अधिकारी,जिल्हा कामगार कार्यालय परभणी यांच्या नावे प्रती कामगार १००/२०० रुपये घेऊन पुर्णा नगर परिषदेतील स्वच्छता निरिक्षक नईम खान छोटे खान पठाण व प्रशासकीय अधिकारी यांनी दिल्याचे उघडकीस आले आहे या संदर्भात संस्थापक अध्यक्ष दुधगोंडे यांनी मागील फेब्रुवारी/मार्च २०२२ या महिण्यात लेखी स्वरूपात दिलेल्या तक्रारी नंतर नगर परिषदेचे तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी नितेशकुमार बोलेलो यांनी या असंख्य ९० दिवस बांधकाम कामगार अनुभव प्रमाणपत्रांची नगर परिषदेत कुठेही अधिकृत नोंद नसल्याचे जिल्हा कामगार अधिकारी विद्याधर मानगावकर यांना लेखी स्वरूपात पत्र दिल्यानंतर देखील सदरील पत्र जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात मात्र पोहोचलेच नसल्याचे तक्रारदार दुधगोंडे यांना जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सांगितल्यामुळे या प्रकरणात संबंधित कार्यालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचे निदर्शनास येत असून जिल्ह्यात सर्वत्र बोगस बांधकाम कामगारांच्या बोगस कागदपत्रांच्या आधारे नोदणी करून शासकीय योजनांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळ्याच कार्यरत झाल्याचे दिसत असून या प्रकरणाची जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी आदेश काढावेत अशी मागणी होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या