💥यावेळी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख आसीफ उर्फ बबलू शेख रफिक असे असून त्याच्याकडून धारदार खंजर जप्त💥
फुलचंद भगत
वाशिम :- वाशिम जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंह यांनी जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्वीकारल्या पासुन जिल्हयातील गुंड प्रवत्तीच्या इसमाच्या मुसक्या आवळल्या आहेत व ईतर अवैद्य कृत्याना आळा घातला आहे.
सचिन रामदास गोखले प्रविक्षाधीन पोउपनि हे दिनांक २५/०६/२०२२ रोजी १७.०० वा. पासून मनापोकॉ.१०९६, पोकॉ.८३१, मपोकॉ. ४१८, ११४३ सह पोलीस स्टेशन हद्दीतील मुख्य बाजारपेठ परिसरात पायदळ पेट्रोलींग करीत असतांना १९.२० वा. सूमारास आम्हाला गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की, गौरक्षण विहीर, बाबूल हॉटेलजवळ एक अज्ञात युवक धारदार चाकू घेऊन फिरत आहे व चाकूच्या धाकाने लोकांमध्ये जरब बसवित आहे.अशा माहितीवरून आम्ही तात्काळ डी.बी. पथकातील पोहेकॉ.३४७, पोना. २१०, व पोकॉ.४३ यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवून सोबत ०२ पंचांना घेवून येण्याबाबत सांगितले. त्यानंतर डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार व सोबत दोन पंच असे पाटणी चौक येथे १९.३५ वा.पोहोचले व सदर बातमीची खातरजमा करण्यासाठी १९.४५ वाजताच्या सुमारास मी पो.हे.कॉ.३४७/ श्रीवास्तव, पो.ना.क. २१०/ मात्रे, मनापोकॉ.१०९६/चित्रा, पोकॉ.क. २४३/महाले,पोकॉ.८३१/चिकटे, मपोकॉ. ४१८, ११४३ असे गौरक्षण विहीर, बाबूल हॉटेलजवळ जाऊन सापळा लावला असता त्याठिकाणी एक अज्ञात युवक संशयितरित्या मिळून आला त्यानंतर उपस्थित ०२ पंचांसमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख आसीफ उर्फ बबलू शेख रफिक, वय २९ वर्ष, रा. चामुंडादेवी, फुकटपूरा, वाशिम असे सांगितले. वरून त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक लोखंडी खंजर ९ इंच पाते
लांब५ इंच लांब मुठ असलेला मिळून आला. त्यावरुन परीविक्षाधीन पोलीस उप निरीक्षक सचिन गोखले यांचे फिर्यादवरुन पोस्टे वाशिम शहर येथे अप क ५१६/२२ क ४,२५ आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगीरी मा पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंह साहेब, मा अपर पोलीस अधिक्षक श्री गोरख भामरे साहेब, मा उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुनिलकुमार पुजारी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीसांनी केली आहे.....
0 टिप्पण्या