💥15 आरोपींवर कारवाई एकून 12,62,870/- रुपयांचा मुद्देमाल जप्त💥
वाशिम (दि.०८ जुन २०२२) :- वाशिम जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांवर कार्यवाही करुन जिल्ह्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरिता मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांच्याकडून आपले अधिनस्त सर्वच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच तिन्ही उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना वारंवार लेखी, तोंडी तसेच बैठकांचे आयोजन करुन नियमित आदेश करुन सुचना व मार्गदर्शन केल्या जात आहे. त्याच प्रमाणे वेळोवेळी विशेष पथका मार्फत अवैध धंद्यांवर कारवाई करुन अवैध धंदे करणारे इसमांवार कडक कायदेशी कार्यवाही करण्यात येत असून याचा प्रत्यय आपणास कायमच दिसून येत असतो.
दि.०७.०६.२०२२ रोजी विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. भारत लसंते यांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन शिरपुरचे हद्दीतील ग्राम पिपंरी सरहद गावाजवळ काही इसम ताश पत्यांचा खेळ खेळत आहेत. याबाबत सपोनि. लसंते यांनी मा. पोलीस अधिक्षक यांना माहीती देऊन त्यांचे आदेश व मार्गदर्शनात आपले पथका मार्फत ग्राम- पिंपरी सरहद गावा पासून जवळच मालेगांव ते डोणगांवरोडला लागून असलेल्या प्रकाश प्रल्हाद गाभने वय - ३३ वर्ष रा. पिंपरी सरहद ता. रिसोड यांचे शेतातील टिनाचे शेड मध्ये काही इसम ५२ ताश पत्यावर एक्का बादशहा नावाचा पैशाचे हार जीतचा खेळ खेळत असल्याची खात्री झाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून धाड टाकली असता सदर टिन शेडमध्ये एका ठिकाणी १५ इसम अवैधरित्या ५२ ताशपत्यांचा खेळ खेळत असतांना मिळून आले. सदर ठिकाणचे व इसमांचे झडतीमधून नगदी ८२,३७० /- रुपये, १३ मोबाईल फोन किं. अं. ५७,५००/- रुपये, बावन ताशपत्यांचे ०६ बॉक्स किं. ३०००/- रुपये, ०९ मोटार सायकल किं.अ.५,२०,०००/- रुपये, एक मारोती सुझुकी डिजायर चारचाकी वाहन किं.अ.६,००,०००/- रुपये व इतर साहीत्य असा एकून वरील प्रमाणे १२,६२,८७०/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला असून जप्त करण्यात आला आहे. याबाबत शेत मालकासह एकून १५ आरोपीतांवर महाराष्ट्र जुगार कायद्याचे कलम ४, ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. शिरपुर यांचेकडून करण्यात येत आहे.
सदर कार्यावाहीत मा. पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक भारत लसंते व त्यांचे सोबतचे पो.स्टाप नापोकॉ/ ३६१ कैलास नागरे, पोकॉ. १२६६ राजकुमार यादव,पोकॉ./१२ अमोल कांबळे, पोकॉ/३८३ दिपक मुळे यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या