💥हिंगोली येथील सेवासदनच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी...!


💥सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांची राहणार विशेष उपस्थिती💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली : येथील सेवा सदनच्या वतीने 22 जून रोजी तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत देशाच्या सिमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांच्या माता-पित्यांचा विशेष सत्कार करून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्‍त केली जाणार आहे. 


मागील तीन वर्षापासून दिव्यांग शिक्षीका तसेच समाजसेविका मिरा कदम, धनराज कदम यांच्या पुढाकारातून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांना तसेच अनाथ विद्यार्थ्यांना लोकसहभागातून शिक्षण दिले जात आहे. यासाठी साथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सेवा सदन वसतीगृह चालविण्यात येते. यासाठी समाजातील दानशूर व्यक्‍तींची मदत होत असल्याने कदम दाम्पत्याने हे शिवधनुष्य पेलले आहे. यंदा 22 जून रोजी सेवा सदनचा तिसरा वर्धापन दिन प्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमात देशाच्या सिमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांच्या माता-पित्यांचा विशेष सत्कार व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या मान्यवरांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. येथील अकोला बायपास भागात असलेल्या मधुरदिप मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम पार पडणार असून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन धनराज कदम, मिरा कदम,  जयदिप देशमुख,भूषण देशमुख ,महेश सराफ, अमोल भिसे, शिवाजी कर्‍हाळे, रोहित कंजे,  समीर भिसे व सेवा सदन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या